टेम्प्लेट- ९२२ -- पूरक जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:27 AM2021-07-16T04:27:38+5:302021-07-16T04:27:38+5:30
वीज पडून यापूर्वी मृत्यू झालेल्या १४ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान वाटप केल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट ...
वीज पडून यापूर्वी मृत्यू झालेल्या १४ जणांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान वाटप केल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. या वर्षांत दगावलेल्या एका मृताच्या नातेवाइकांना चार लाख रुपये मिळवून देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे.
--------
३) जिल्ह्यातील वीज अटकाव यंत्रणा-
- जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा मुरबाडमधील तुळई व न्याहडी या दोन ठिकाणी आहे. जिल्ह्यात ४८ ठिकाणी यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे.
४) किती कार्यान्वित आहेत --
मुरबाड तालुक्यातील तुळई व न्याहडी या दोन गावांच्या शिवारात यंत्रणा बसवल्या आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही ठिकाणे निश्चित केली आहेत.
-------
५) वीज कडाडण्याच्या वेळी काय काळजी घ्यावी
- मोबाइल बंद करावा. मेटॅलिक म्हणजे धातूच्या वस्तू जवळ असू नयेत. जमिनीशी संपर्क असावा. पायात रबरी चप्पल, बूट असावेत. उकिवडे बसावे. मांडी घालून बसू नये तर, डोके दोन्ही गुडघ्यात घ्यावे. शक्य झाल्यास झोपावे. उभे राहू नये. इमारती, झाडे, विजेचे खांब याजवळ उभे राहू नये. एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास एकत्र बसू नये. चार ते पाच फुटांच्या अंतरावर बसावे. एकत्र असलेल्यांवर राजस्थानमध्ये वीज पडून अलीकडेच मोठी दुर्घटना घडली.
- प्रा. एन. डी. मांडगे, सचिव, मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग
............