टेम्प्लेट - केवळ घोषणांचा आधार; निराधारांना एक हजाराची मदत कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:50+5:302021-05-14T04:39:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर थांबविण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. या कालावधीत संजय गांधी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर थांबविण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली. या कालावधीत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, आदी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून त्यांच्या बँक खात्यात ॲडव्हान्स एक हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील या योजनांच्या ३१ हजार १५२ लाभार्थ्यांपैकी बहुतांश लाभार्थी या रकमेपासून वंचित आहेत. केवळ घोषणेचा आधार मिळालेल्या या निराधारांना एक हजारांची मदत कधी मिळणार, असा सवाल लाभार्थ्यांकडून केला जात आहे.
गोरगरीब, निराधारांसाठी केंद्र व राज्य पुरस्कृत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, आदी योजना राबविण्यात येतात. त्याद्वारे वयोवृद्ध, निराधार, घटस्फोटित, विधवा आणि दिव्यांग, आदींना अर्थसाहाय्यांचा लाभ मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ३१ हजार १५२ लाभार्थ्यांना राज्य शासन एक हजार रुपयांचे अर्थसाहाय्य ॲडव्हान्स त्यांच्या बँक खात्यात जमा करून त्यांची आर्थिक समस्या दूर करणार आहे. मात्र बहुतांश लाभार्थी आजपर्यंत या लाभापासून वंचित आहेत. राज्य व केंद्र शासन पुरस्कृत पाच अर्थसाहाय्य योजना आहेत. ॲडव्हान्स रकमेचा लाभ आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेने जिल्ह्यातील वंचित बँकांमध्ये फेऱ्या मारून विचारणा करीत आहेत.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व त्यावरील वृद्धांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन सुरू आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. इंदिरा गांधी योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्तिवेतन मिळते. त्याचा लाभ जिल्ह्यातील चार हजार २९३ वृद्धांना मिळतो. जिल्ह्यातील घटस्फोटित लाभार्थी महिलांना याचा लाभ दिला जात आहे. परित्यक्ता असलेल्या महिला बहुधा शासकीय, संस्थेच्या अनाथालयात राहतात. त्यांना या अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मिळतो.
------- पूरक जोड आहे.....