टेम्प्लेट- पूरक जोड - प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:52+5:302021-05-14T04:39:52+5:30
------ * योजनानिहाय जिल्ह्यातील लाभार्थी खालीलप्रमाणे - १) संजय गांधी योजना - ९४५७ २) श्रावणबाळ योजना - ४९९६ ३) ...
------
* योजनानिहाय जिल्ह्यातील लाभार्थी खालीलप्रमाणे -
१) संजय गांधी योजना - ९४५७
२) श्रावणबाळ योजना - ४९९६
३) इंदिरा गांधी निराधार योजना- ४२९३
४) संजय गांधी निराधार विधवा अनुदान - ९५७६
५) दिव्यांग अनुदान योजना - २८३०
---------
* प्रतिक्रिया -
१) आम्हा गरीब लोकांकडे प्रवासासाठी पैसे व कोणती साधने नाहीत. तरीही आम्ही मोठ्या आशेने बॅंक गाठतो. खात्यातील पैसे काढण्यासाठी आम्ही तीन-तीन तास रांग लावतो. आम्हाला या योजनेचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत.
- ताराबाई वाघ, खोंड्याची वाडी, मुरबाड
-----
२) या लाॅकडाऊनच्या संकटकाळी राज्य शासनाने आमची आठवण ठेवून आम्हा गरीब, निराधार महिलांच्या बँक खात्यात जी रक्कम जमा करण्याचे जाहीर केले, ती वेळेत मिळणे अपेक्षित आहे. शासनाची ही आर्थिक मदत आमच्यासाठी लाखमोलाची असणार आहे.
- अंजनाबाई कडू, कसारा
---------------
३) कोरोनाच्या काळात शासनाकडून मिळणारी ही मदत तुटपुंजी असली तरी लाखमोलाचा आधार देणारी आहे. या संकटकाळी शासनाने केलेल्या मदतीसाठी माझा परिवार आभारी आहे; पण आता ही मदत सर्वांनाच वेळेवर मिळण्याची गरज आहे.
- दुर्गा सुरेश दुडे, कसारा,
-----------
४) मला चार-चार महिन्यांतून एकदा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळतात. लॉकडाऊनच्या काळात ते लवकर मिळतील ही अपेक्षा आहे; पण संकटात पैसे उशिरा मिळत असतील तर आम्ही जगायचे कसे?
- अनुबाई सोणावले, भातसानगर,
--------------
५) या म्हातारपणात चालणेही अवघड झाले आहे. तरीही मोठ्या आशेने आम्हाला बँकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. बँकेत रांग लावूनही जर पैसे जमा नसतील, तर रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते. त्यामुळे आम्ही आता वैतागून आठ महिन्यांपासून बँकेत पैसे काढायला गेलो नाही. त्यामुळे बँकेत पैसे आले असतील तर बँकेने निरोप पाठविण्याची गरज आहे.
- झिपरूबाई पोसू वाघ, ठाकूर शेत, मुरबाड
--------
* संजय गांधी, श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेचे सुमारे दोन ते अडीच हजार लाभार्थी मुरबाड तालुक्यात आहेत. मार्च महिन्यापर्यंत सर्वांच्या खात्यावर अनुदान अदा केले आहे. त्यातही काही लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे अनुदान मिळत नसेल तर त्यांनी निदर्शनात आणून दिले पाहिजे. याशिवाय या लाभार्थ्यांनी या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित आहे.
- एस. पंडित, नायब तहसीलदार
संजय गांधी योजना, मुरबाड
...........