टेम्पोच्या धडकेत टायर बदलणाऱ्या क्लिनरचा मृत्यु: दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:07 PM2021-05-16T17:07:30+5:302021-05-16T21:50:44+5:30
कॅडबरी ब्रिज येथे आपल्या ट्रकचा टायर बदलणाºया शमलाल सरबजीत हरजन (३७, रा. मुलूंड, मुंबई) याला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कॅडबरी ब्रिज येथे आपल्या ट्रकचा टायर बदलणाºया शमलाल सरबजीत हरजन (३७, रा. मुलूंड, मुंबई) याला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी टेम्पो चालक प्रथमेश कळजुनकर (२७) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुलूंड येथील रहिवाशी अरविंद वर्मा (२९) आणि त्यांच्यासोबत असलेले क्लिनर शमलाल हे त्यांच्या ट्रकचा मागील टायर फुटल्यामुळे तो १५ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बदलत होते. त्याचवेळी ठाणे ते मुंबईकडे जाणााºया मार्गावरुन आलेल्या एका टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. यात शमलाल हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शमलाल यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्याान, टेम्पो चालक प्रथमेश कळजुनकर आणि शमलाल यांचे सहकारी वर्मा हे दोघेही या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. कळजुनकर याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज जोंधळे हे अधिक तपास करीत आहेत.