दोघा नगरसेवकांना तात्पुरता दिलासा
By admin | Published: December 9, 2015 01:18 AM2015-12-09T01:18:01+5:302015-12-09T01:18:01+5:30
बेकायदेशीर व अवैध बांधकामांमध्ये गुंतलेल्या ठाणे महापालिकेच्या ३ नगरसेवकांना ठाणे महापालिका आयुक्तांनी विशेषाधिकाराचा वापर करीत अपात्र ठरवले
मुंबई : बेकायदेशीर व अवैध बांधकामांमध्ये गुंतलेल्या ठाणे महापालिकेच्या ३ नगरसेवकांना ठाणे महापालिका आयुक्तांनी विशेषाधिकाराचा वापर करीत अपात्र ठरवले. उच्च न्यायालयाने एका नगरसेवकाला आधीच दिलासा दिल्याने उर्वरित दोघांनाही तात्पुरता दिलासा देत ठाणे महापालिकेला दोन नगरसेवकांच्या जागा २२ डिसेंबरपर्यंत न भरण्याचा आदेश दिला.
तिन्ही नगरसेवक बेकायदेशीर बांधकामात संरक्षण देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महाराष्ट्र महापालिका कायद्याच्या कलम १० (१) (डी) अंतर्गत विशेषाधिकारांचा वापर करीत अपात्र ठरवले. निवडून येण्यापूर्वी बांधण्यात आलेले बांधकाम पालिका कारवाई करण्यासाठी ग्राह्य धरू शकत नाही. तसेच अपात्र ठरवण्याचा निर्णय न्यायालयालाच घ्यावा लागेल असा युक्तिवाद नगरसेवकांतर्फे न्यायालयात करण्यात आला.