अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 06:24 AM2021-01-31T06:24:27+5:302021-01-31T06:24:48+5:30

अल्पवयीन पीडित मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असल्याने तिला चांगल्या पैशांच्या नोकरीचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चार जणांना शनिवारी विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

Ten years imprisonment for abusing a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची शिक्षा

Next

 ठाणे : अल्पवयीन पीडित मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे असल्याने तिला चांगल्या पैशांच्या नोकरीचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चार जणांना शनिवारी विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. त्यातच अत्याचार करणारा आरोपी कल्पेश टेलर याला दहा वर्षांची तर अन्य तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली.
पीडित मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू करायचे होते, म्हणून ती एका ॲडव्हरटाइजिंग साईटवरील नंबरवरून आरोपी कल्पेश याच्या संपर्कात आली. 
त्याने तिला भेटण्यासाठी डहाणू येथे बोलवून चांगल्या पैशांच्या नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर तेथील लॉजमध्ये ती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना अत्याचार केला. त्यानंतर कल्पेश याने बनावट आधारकार्ड तयार करून आरोपी विनोद यादव, सुरेंद्र यादव आणि बबिता शुभनारायण यादव यांच्या मदतीने तिला वेश्याव्यवसायात ढकलले. हा प्रकार १९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान मुंबईत घडला. 
या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 
हे प्रकरण विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयात आले. त्यावेळी सरकारी वकील संजय मोरे यांनी सादर केलेल्या साक्षी-पुराव्यांसह १२ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीश शिरभाते यांनी चारही आरोपींना दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. 

Web Title: Ten years imprisonment for abusing a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.