लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करुन फसवणूक करणाऱ्यास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:07 PM2021-08-26T22:07:38+5:302021-08-26T22:10:05+5:30
विवाहित असूनही लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन तरुणीची फसवणूक करणाºया आॅबरी डिक्रुझ उर्फ स्टीव्हन (३३) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कैदेची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी सुनावली आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: विवाहित असूनही लग्नाच्या अमिषाने लैंगिक अत्याचार करुन तरुणीची फसवणूक करणाºया आॅबरी डिक्रुझ उर्फ स्टीव्हन (३३) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कैदेची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी सुनावली आली. पाच वर्षांपूर्वी तुर्भे तसेच मीरा रोड येथे हा प्रकार घडला होता.
नोव्हेंबर २०१४ ते २१ सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये स्टीव्हन याने कोपरखैरणे येथील एका २३ वर्षीय तरुणीशी मैत्री केली. नंतर तिला लग्नाचे अमिष दाखवित तिच्यासोबत मीरा रोड येथे राहू लागला. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडून खर्चासाठी, नशेसाठी तसेच दारुसाठी दोन लाख रुपये घेतले. मात्र, आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ करीत मारहाणही केली. विवाहित असूनही फसवणूकीने त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समजल्यानंतर तिने त्याला विरोध केला. त्यानंतरही त्याने नवी मुंबईतील तुर्भे येथील एका घरात मोबाईलमधील तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार करीत तिच्याकडून आणखी पैसेही उकळले. पुन्हा पाच लाखांचीही त्याने मागणी केली. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून पिडितेने अखेर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकाराचे साक्षी पुरावे गोळा करुन आरोपीला शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान जोरदार बाजू मांडली. तर आरोपीची बाजू अॅड. ससाणे यांनी मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर न्या. गुप्ता यांनी आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.