उल्हासनगरात टेंडर घोटाळा, भाजपचा आरोप; महापालिका आयुक्तांना १५ दिवसाची मुदत

By सदानंद नाईक | Published: January 20, 2024 08:23 PM2024-01-20T20:23:38+5:302024-01-20T20:24:10+5:30

उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला.

Tender scam in Ulhasnagar, BJP alleges 15 days deadline for municipal commissioner | उल्हासनगरात टेंडर घोटाळा, भाजपचा आरोप; महापालिका आयुक्तांना १५ दिवसाची मुदत

उल्हासनगरात टेंडर घोटाळा, भाजपचा आरोप; महापालिका आयुक्तांना १५ दिवसाची मुदत

उल्हासनगर : महापालिकेत संगनमत करून एकाच ठेकेदाराला कोट्यवधींचे ठेके देत असल्याने, मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, प्रकाश माखिजा आदीजन उपस्थित होते. तर निवेदनानुसार कामे दिली जात असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. 

उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला. अटीशर्तीचे उल्लंघन व खोटे कागदपत्र जोडून त्या ठेकेदाराला कामे दिली जात आहे. महापालिकेकडून मिळालेले कामे तो ठेकेदार लहान ठेकेदाराद्वारे करून घेत असल्याचे रामचंदानी म्हणाले. यामुळे १०० कोटीचा घोटाळा झाला असून त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याचे रामचंदानी म्हणाले. महापालिकेने १५ दिवसात कारवाई केली नाहीतर, भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा रामचंदानी यांनी दिली आहे. 

शहरात हजारो कोटींची विकास कामे सुरू असून त्यामध्ये ४२३ कोटींची भुयार गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, १५० कोटींची एमएमआरडीएचे रस्ते योजना, ४५ कोटीच्या निधीतून मूलभूत सुखसुविधेतील विविध कामे यांच्यासह अन्य विकास कामे सुरू आहे. याच कामाच्या टेंडरवरून ठेकेदारात, राजकीय नेते व महापालिका अधिकाऱ्याचा टेंडरवार सुरू असल्याचा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेला शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी, नरेंद्र राजांनी, प्रकाश माखिजा, मीना आयलानी, अर्चना करणकाळे, राजेश वधारीया यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रतिक्रिया
 १) अजीज शेख
 (महापालिका आयुक्त)
 महापालिका विकास कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून निविदेत सहभागी होणाऱ्या कंपनीच्या कागदपत्रांची छाननी केली जाते. निविदेत कमी किंमतीच्या ठेकेदाराला काम दिली जातात. 

२) अरुण अशान
 (शिवसेना नेते)
 महापालिकेचे काम देतांना कोणताही राजकीय दबाव आणण्याचे कारण नाही. महापालिका निविदेतील अटी-शर्तीनुसार विकास कामे देते. रामचंदानी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.

 ३) प्रेम झा 
(पी अँड झा कंपनीचे प्रमुख)
 महापालिका निविदा प्रक्रियेत भाग घेऊन नियमानुसार कंपनीला काम मिळते. केलेले आरोप खोटे आहेत.

Web Title: Tender scam in Ulhasnagar, BJP alleges 15 days deadline for municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.