बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता; इंटरनेट सेवाही बंद

By पंकज पाटील | Published: August 21, 2024 01:58 PM2024-08-21T13:58:12+5:302024-08-21T13:58:58+5:30

कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Tense silence in Badlapur today; Internet service also off | बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता; इंटरनेट सेवाही बंद

बदलापुरात आज तणावपूर्ण शांतता; इंटरनेट सेवाही बंद

बदलापूरबदलापूरमधील चिमुकल्या दोन मुलींवर अत्याचार झाला. बदलापूरमधील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केलं रास्ता रोको केला. त्यानंतर आता आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. 

कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे. तर शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

बदलापूरचं आंदोलन राजकारणानं प्रेरित - मुख्यमंत्री
या आंदोलनासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना काल त्रास झाला. 8-9 तास रेल्वे बंद होती, असे व्हायरला नको होते. हीदेखील दुर्देवी घटना आहे. लाखो प्रवासी त्या रल्वेत होते. त्यातही मुलं होती, त्यातही महिला होत्या, त्यातही ज्येष्ठ नागरिक होते. परंतू कालचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर... जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री मोहोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती."
 

Web Title: Tense silence in Badlapur today; Internet service also off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.