अंबरनाथला पाणी पेटल्याने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:35 AM2018-05-20T03:35:39+5:302018-05-20T03:35:39+5:30

पोलिसांवर मध्यस्थीची वेळ : अधिकाऱ्यांच्या चुकीचा भुर्दंड नगरसेवकांना

Tension due to flooding Ambarnath | अंबरनाथला पाणी पेटल्याने तणाव

अंबरनाथला पाणी पेटल्याने तणाव

Next

अंबरनाथ: अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागाला अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच काही अधिकाºयांनी ठरावीक इमारतींना पाणीपुरवठा करणारी स्वत:ची यंत्रणा उभारल्याने नागरी वस्तीला मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे त्रासलेल्या स्थानिक नगरसेवकांनी पाणीवितरण व्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत अधिकाºयांना धारेवर धरले आहे, तर अधिकारी मात्र नगरसेवकच पाणीपुरवठ्याच अडथळा निर्माण करीत असल्याचे आरोप करत आहेत. त्यामुळे पाणीप्रश्नावरून अधिकारी आणि नगरसेवकांमध्ये इतका तणाव निर्माण झाला आहे, की या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील जावसई गांव, फुलेनगर, महेंद्रनगर, कमलाकरनगर, कोहोजगांव, नालंदानगर या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. यासोबत याच परिसरातील इमारतींनाही नियमित पाणीपुरवठा होत नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे काही भागांना दोन ते तीन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जातो. एवढेच नव्हे, तर नवीन भेंडीपाडा भागातील मुख्य पाण्याच्या टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा या भागांना कमी पडतो. जावसई गावापर्यंत पाणी पोहचवितांना मध्येच त्या पाण्याची चोरी केली जाते. या सर्व बाबींची कल्पना अधिकारी आणि नगरसेवकांना आहे. पाणी न आल्याने नागरिक नगरसेवकांना घेराव घालत आहेत. पाण्यासाठी अधिकाºयांना विचारणा केली असता ‘उद्या मिळेल पाणी’ हे एकच उत्तर दिले जाते. मात्र प्रत्यक्षात अधिकाºयांचा ‘उद्या’ कधीच येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
जावसईसह कोहोजगावाला होणारा पाणी पुरवठा अनियमित झाल्याने दोन्ही गावे त्रस्त असतांना अधिकारी मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करतांना दिसत आहेत. ज्या भागात तीव्र पाणीटंचाई आहे त्या भागासाठी स्वतंत्र पाणीयोजना होती. त्या ठिकाणी वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्या टाकणे बंधनकारक होते. मात्र जीवन प्राधिकरणाने ठरावीक वेळेत या योजनेचे कामच पूर्ण केलेले नाही. जलकुंभ उभे असले, तरी गेल्या दोन वर्षांपासून ते कोरडे पडले आहेत. भेंडीपाड्यातून पाणीपुरवठा करतांना टाकीच्या खाली असलेल्या वस्तीलादेखील त्यातूनच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी देणे गरजेचे आहे त्या ठिकाणी पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी सोडविण्याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे. नारायणनगर येथील पाण्याची टाकी बांधून तयार असतानाही तेथे अजून जलकुंभासाठीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केलेले नाही. अधिकारी हे काम पूर्ण झाल्याचा दावा करत असले तरी वितरण व्यवस्था अजून सुरु झालेली नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडलेल्या अवस्थेतच होते. या जलकुंभातुन पाणी वितरण व्यवस्था सुरु झाल्यास या भागातील ९० टक्के पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. मात्र ते काम होऊनही पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही.
असाच काहीसा प्रकार जावसई गावाबाबत आहे. त्या ठिकाणी असलेल्या जलकुंभाबाबतही अधिकारी गांभीर्याने काम करतांना दिसत नाही. जलकुंभातुन पाणीवितरण सुरु झाल्यास कोणतीच अडचणी निर्माण होणार नाही, याची कल्पना अधिकाºयांना आहे. मात्र तो प्रश्न निकाली काढण्यात चालढकल केली जात आहे. या योजनेचे काम पाहणाºया अधिकाºयांनी ठेकेदाराला झुकते माप दिल्याने ते काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. संथगतीने काम होऊनही ठेकेदाराला दंड ठोठावलेला नाही. त्यामुळे योजना वेळेत पूर्ण झालेली नाही.
या संदर्भात अधिकाºयांना विचारले असता नालंदानगर येथील टाकीचे काम आणि वाहिनीचे काम पूर्ण झाले असून आठवडाभरात त्याची चाचणी घेतली जाईल आणि नंतर जलकुंभातुन पाणीपुरवठा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

जुन्या वाहिन्यांनाच जोडल्या नव्या जलवाहिन्या
अंबरनाथमध्ये पाणीवितरण व्यवस्थेत कोणतीच सुधारणा झालेली नाही. ७८ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतून नवीन जलवाहिन्या टाकणे गरजेचे असतांना जुन्या वाहिन्या तशाच ठेवून नव्या वाहिन्यांना जोडण्यात आल्या आहे. त्यामुळे पाण्याची गळतीही आधीपेक्षा जास्त झाल्याचे समोर आले आहे.

बॅरेज धरणातून कमी पाणी उचलता येत असल्याने एमआयडीसीकडून अतिरीक्त पाणी घेण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर पश्चिम भागासाठी नव्याने दोन दशलक्ष लीटर्स एवढा अतिरिक्त पाणीपुरवठाही घेण्यात आला. मात्र हे वाढीव पाणी नक्की कोठे गेले, याचा जाब आता नागरिक विचारत आहे. योजनेचे काम झालेले असतानाही त्या योजनेच्या वाहिन्यांची चाचणी अजूनही करण्यात आलेली नाही. चाचणीला विलंब होत असल्याने प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. पाण्याच्या टाकी बांधूनही त्याचा वितरण व्यवस्थेला फायदाच झालेला नाही. जावसई आणि कोहोजगांवच्या पाणी प्रश्नावरुन दोन गावात वाद निर्माण झाला आहे. अधिकारी थेट जावसईकरांना कोहोजगावचे नाव पुढे करुन त्यांच्यामुळे पाणी येत नाही, असा आरोप करत आहेत. मूळात कोहोजगावालाच नियमित पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांनीही अधिकाºयांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

पाणीप्रश्न वाढत असल्याने आता अधिकाºयांनी या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यातून स्थानिक नगरसेवकांची समजूत घातली जात आहे. मात्र प्रत्यक्षात ज्या अधिकाºयांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे, ते मात्र निर्धास्त फिरत आहेत.

Web Title: Tension due to flooding Ambarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी