वाशिंदजवळ भीषण अपघात, एकाच दुचाकीवरून ४ जणांचा जीवघेणा प्रवास; तिघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:53 PM2021-06-23T22:53:00+5:302021-06-23T22:53:13+5:30

या भीषण अपघातात विरुद्ध दिशेने येऊन धडकणाऱ्या दुचाकी वरील 3 जण जागीच मयत झालें तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली.

Terrible accident between Two Wheeler and Tractor near Washind, three died on the spot | वाशिंदजवळ भीषण अपघात, एकाच दुचाकीवरून ४ जणांचा जीवघेणा प्रवास; तिघांचा जागीच मृत्यू

वाशिंदजवळ भीषण अपघात, एकाच दुचाकीवरून ४ जणांचा जीवघेणा प्रवास; तिघांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद खातीवली जवळ भीषण आपघात होऊन 3 जण जागीच ठार झालें तर एक 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.आज संध्याकाळी 4 च्या सुमारास खातीवली वासिंद हायवे वरील हॉटेल धिंग्राच्या पुढे नाशिकहून मुबंईकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने हा भीषण अपघात  झाला. 

ललन राय हा ट्रॅक्टर चालक मुंबईहून वासिंद गावाकडे जात असताना अचानक पणे समोरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येणारी दुचाकी क्रमांक MH 04 SC 490 चा चालक थेट ट्रॅक्टर वर येऊन धडकला. या भीषण अपघातात विरुद्ध दिशेने येऊन धडकणाऱ्या दुचाकी वरील 3 जण जागीच मयत झालें तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. मंजुळा सखाराम मुकणे, अजनूप, शिरोळ, गणपत दगडू वाघे. परदेश वाडी इगतपुरी, बाबू मधू फसाळे, दहिवली मुरबाड अशी मयत झालेल्यांची नावे असून मयतांचे मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवव्हिच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

या अपघातात एक नऊ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला सायन हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच, वासिंद पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, महामार्ग पोलीस शहापूर टॅपचे अधिकारी कर्मचारी, दाखल झाले या दरम्यान आपत्ती टीम सदस्य निलेश शेलार, निलेश काठोळे ,व  स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रिक्षामध्ये रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान या प्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव पुढील तपास करीत असून ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुर्घटनास्थळाजवळी स्पीड ब्रेकर काढल्याने अपघातात वाढ
दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे स्पीड ब्रेकर होते ते हायवेच्या ठेकेदार कंपनीने काढल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी व येणारी वाहने सुसाट असतात. परिणामी पेट्रोल पंपावरून येणारी वाहने असोत अथवा सर्व्हिस रोडवरून येणारी वाहने असोत ती मुख्य रस्त्यावर स्पीडने येत असतात परिणामी मागून येणाऱ्या वाहनांची काही कल्पना नसल्याने अपघात होतात. या ठिकाणी रबरिंग स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे अशी मागणी आता वासिंद व खातीवलीकर करीत आहेत.
 

Web Title: Terrible accident between Two Wheeler and Tractor near Washind, three died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात