पालघर येथील वाघोबा खिंडीत एसटीच्या रातराणी बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:38 AM2022-05-27T08:38:29+5:302022-05-27T08:40:24+5:30
बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस वाघोबा खिंडीतील उतारावरून २५ फूट खाली कोसळली.
पालघर: भुसावळवरून पहाटे पालघरकडे येणारी रातराणी बस चालकाचे नियंत्रण सुटून वाघोबा खिंडीत उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून, काहींना पालघर ग्रामीण रुग्णालयात तर काहींना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भुसावळवरून बोईसर डेपोकडे येणारी ही बस पहाटे ६ वाजल्याच्या सुमारास पालघर-मासवण रस्त्यावरून पालघरकडे येत असताना बस चालकचे नियंत्रण सुटल्याने बस वाघोबा खिंडीतील उतारावरून २५ फूट खाली कोसळली. या अपघातात १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस, महसूल, आरोग्य विभागासह एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. जखमींना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले. बस चालक मद्यपान करून बस चालवत होता, अशी माहिती प्रवाश्यांनी दिली.