भिवंडीत आगींचे सत्र थांबता थांबेना, डाइंग कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:52 PM2022-02-17T15:52:36+5:302022-02-17T15:53:15+5:30
आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान भिवंडीत वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटना रोखण्यात प्रशासनाला का यश येत नाही, यासंदर्भात नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
भिवंडी- भिवंडीतआगीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा अग्नितांडव बघायला मिळाले. शहरालागतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मीठपाडा परिसरात असलेल्या धारिया डाईंगला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
या डाईंगच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर बनवण्यात आलेल्या अनधिकृत पत्र्याच्या शेडमध्ये ही आग लागल्याने तेथील कच्चा माल भंगार या आगीत जळून खाक झाला तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर कापड, धागे याची साठवणूक करून ठेवण्यात आली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठे नुकसान टळले.