Ambernath: अंबरनाथमध्ये गुन्हेगारांची नंग्या तलवारी दाखवत माजवली दहशत, चार आरोपी अटकेत

By पंकज पाटील | Published: October 19, 2023 05:39 PM2023-10-19T17:39:54+5:302023-10-19T17:40:19+5:30

Ambernath News: अंबरनाथमध्ये चार गुंडांनी भररस्त्यात नांग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी केबिन रोड पर्यंत या गुन्हेगारांनी आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

Terror in Ambernath by showing bare swords of criminals, four accused arrested | Ambernath: अंबरनाथमध्ये गुन्हेगारांची नंग्या तलवारी दाखवत माजवली दहशत, चार आरोपी अटकेत

Ambernath: अंबरनाथमध्ये गुन्हेगारांची नंग्या तलवारी दाखवत माजवली दहशत, चार आरोपी अटकेत

- पंकज पाटील 
अंबरनाथ  - अंबरनाथमध्ये चार गुंडांनी भररस्त्यात नांग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी केबिन रोड पर्यंत या गुन्हेगारांनी आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. गुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे,तर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन परिसरात किरकोळ वादातून एका चहाच्या टपरीवर मंगळवारच्या सुमारास काही गुंडांनी चहा कर्मचारीला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी आता हातात नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न केला गेला आहे,गुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे या चारही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

हा सर्व प्रकार 10 ऑक्टोंबर रोजी रात्री घडला असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. चार आरोपीमध्ये दोन अल्पवयीन आरोपी असल्याने अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बाळ सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. दरम्यान गुन्हेगारांकडून भर रस्त्यात अशा प्रकारचे कृत्य केले जात असल्याने पोलिसांची दहशत काहीशी कमी झाली की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. 

Web Title: Terror in Ambernath by showing bare swords of criminals, four accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.