‘आतंक’ने कट्ट्याच्या प्रेक्षकांना केले स्तब्ध; हिंदू-मुस्लिम संबंधांवर आधारित एकांकिका सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:35 AM2019-06-06T00:35:47+5:302019-06-06T00:35:57+5:30
हिंदू-मुसलमान यांच्या संबंधातील वैमनस्याप्रमाणेच त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधातील गोडवाही आतंक या एकांकिकेत नाट्यरूपात मांडला आहे
ठाणे : दहशतवाद हा भारत देशाला लागलेले एक ग्रहण आहे. त्याच आतंकवादाच्या अस्तित्वाची पाळेमुळे भारतातील धर्मभेदात सापडतात. बाहेरून येणाऱ्या शत्रूपेक्षा अंतर्गत दहशतीचे भयावह सत्य म्हणजे एकांकिका ‘आतंक’. अभिनय कट्ट्याच्या वाचक कट्ट्यावर श्रीया आर्ट्स प्रकाशित व्हिजन-नाट्यविलास सहयोग, मुंबईनिर्मित या एकांकिकेचे सादरीकरण झाले.
हिंदू-मुसलमान यांच्या संबंधातील वैमनस्याप्रमाणेच त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधातील गोडवाही आतंक या एकांकिकेत नाट्यरूपात मांडला आहे. एक मुसलमान मोहल्यातील एका मुस्लिम घरातील ही हृदयद्रावक गोष्ट. आपल्या हिंदू मित्राला त्याच्या मुलीची काळजी घेण्याचे वचन देणाºया आणि त्यासाठी आपल्या दहशतवादाच्या प्रवाहात अडकलेल्या मुलाच्या दहशतीपासून तिला वाचवण्यासाठी त्या मुलाचाही अंत करणाºया एका मुसलमानाची भावनाप्रधान गोष्ट म्हणजे लेखक दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही एकांकिका. यात ‘अब्बू’ ही भूमिका नार्वेकर, जुबेरची भूमिका अमित सोलंकी, राशिदाची भूमिका गौरी ढवण, अमिनाची भूमिका शोभना मयेकर, गौरीची भूमिका प्राची आरोसकार, तौफिकची भूमिका नागेश गावकर, आदमची भूमिका प्रसाद सावर्डेकर, सईदची भूमिका दीपक जोईल, अश्फाकची भूमिका निनाद पांचाळ यांनी साकारली. या एकांकिकेचे रंगभूषा उलेश खंदारे, पाशर््वसंगीत संयोजन साईश चोपडेकर यांनी सांभाळले.