सीकेपीच्या नव्या संचालकाची खातेदार, ठेवीदारांकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2015 10:38 PM2015-07-08T22:38:50+5:302015-07-08T22:38:50+5:30
सीकेपी बँकेच्या नव्या संचालकांनीही बँकेच्या ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांकडे पाठच फिरविली आहे. बँक बचाव समितीतर्फे ७ जुलै रोजी विलेपार्ले येथे सभा आयोजित करण्यात आली होती
ठाणे : सीकेपी बँकेच्या नव्या संचालकांनीही बँकेच्या ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांकडे पाठच फिरविली आहे. बँक बचाव समितीतर्फे ७ जुलै रोजी विलेपार्ले येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहून बॅकेची सद्यस्थिती मांडावी असे आवाहन संचालकांना करण्यात आले होते. मात्र, इतके सांगूनही एकही संचालक तिला हजर राहिला नाही. ?एक प्रकारे त्यांनी या बैठकीवर बहिष्कारच टाकला.
या बचाव समितीने ज्या संचालकांना भरघोस मतांनी निवडून दिले, त्या समितीच्या बाबतच संचालकांनी दाखवलेल्या या अनास्थेबद्दल सदस्यांमध्ये नाराजी आहे.
सभेला सुमारे दोनशेच्यावर सदस्य हजर होते. तोरस्कर, व्ही. के. सबनीस, बापू वैद्य, जान्हवी कराडकर, विवेक निक्ते आदींनी मार्गदर्शन केले. तर उपस्थितांचे स्वागत संजय असोडेकर यांनी केले.
ही सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करणारे बिनस'ांचे पत्रक संचालक मंडळातर्फेवाटले गेल्याने गदारोळ होऊन संचालक मंडळाचा धिक्कार करण्यात आला. शेअर कॅपिटल वाढविण्याबाबत बॅकेतर्फे जे आवाहन करण्यात आले होते ते फेटाळून लावण्यात आले व आधी बॅकेचे व्यवहार सुरळीत करा, मगच त्याबाबत विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले गेले. ज्या कर्जदाराकडे दहा कोटीच्या वर कर्ज आहे व ते फेडण्याची जे टाळाटाळ करीत आहेत. त्याची व त्याच्या जामिनदारांची फोटोसह माहिती जाहिर केली जावी अशी मागणी करण्यात आली. जागोजागी सभा, मेळावे घेवून कर्जवसुली करण्यासाठी बॅकेला ठोस पावले उचण्यास भाग पाडावे, असे ठरविण्यात आले. (वार्ताहर)