तारापूर आगीत टेक्सटाइल मशिनरी, कपडा खाक

By admin | Published: January 12, 2017 05:55 AM2017-01-12T05:55:22+5:302017-01-12T05:55:22+5:30

तारापूर एमआयडीसीतील ब्रिलांटो टेक्सटाइल या कारखान्यात बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत मशिनरीसह मोठ्या

Textile machinery, clothes made in Tarapur fire | तारापूर आगीत टेक्सटाइल मशिनरी, कपडा खाक

तारापूर आगीत टेक्सटाइल मशिनरी, कपडा खाक

Next

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील ब्रिलांटो टेक्सटाइल या कारखान्यात बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत मशिनरीसह मोठ्या प्रमाणात कपडा जळून खाक झाला आहे.
कारखान्यातील विव्हिंग खात्या मधील एका लूमला लागलेली आग काही क्षणात मोठ्या प्रमाणात पसरली त्या मधे लूमवर उत्पादन सुरु असलेला कपडा, कच्चा व पक्का कपडा तसेच काही संपूर्ण लूम तर काही लूमचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तारापूर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आग दीड तासात आटोक्यात आणली तर प्रचंड प्रमाणात धूर झाल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना श्वसन उपकरणे घालून आग विझवावी लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही प्राणहानी झालेली नाही. (वार्ताहार )

Web Title: Textile machinery, clothes made in Tarapur fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.