ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा दशकपूर्ती सोहळा, स्थानिक कलाकारांचा स्वर साधना कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:30 PM2018-03-06T16:30:00+5:302018-03-06T16:30:00+5:30
ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयाचा दशकपूर्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी स्थानिक कलाकारांनी मराठी - हिंदी गाणी सादर केली.
ठाणे : ब्रह्मांड कट्टयाच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी रविवारी कशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथील मुख्य नाट्यगृहमध्ये स्थानिक कलाकारांचा स्वर साधना मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमामध्ये सहभागी कलाकार स्थनिक असून कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर केली. सध्याच्या बॉलीवूड युगामध्ये सुद्धा जुन्या गाण्यांना उजाळा देऊन रसिकांच्या जुन्या स्मृती जागृत केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतांनी सर्व गायक कलाकारांनी केली. शिव जयंतीचे औचित्य साधून शाहीर साबळे यांचे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जगदीश कानडे यांनी सादर करुन शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. यानंतर एका पाठोपाठ एक अशी गाण्याची गुंफन सुरु झाली यामध्ये दो सितारोंका जमीन पर है मिलन आज की रात, दिल बेकरार सा है, चेहरे से जरा ऑचल , आरे यार मेरी तुम भी हो गजब, हम तुम्ह युग युग से ये गीत मिलन के गाते रहेगे, डम डम डिगा डिगा अशी रफी, मुकेश, किशोर, लता, आशा यांची गीते सादर केली तर कजरा मोहब्बात ,तुम जो मिल गये सारख्या गाण्यांमा प्रेक्षकांची वन्समोरची दाद मिळाली. मध्यांतर नंतर मोरनी बागा मा बोले आधी रात में या गाण्यावर सानिका गोडे हीने डान्स करुन श्रीदेवीला श्रध्दांजली अर्पण केली. आजीब दास्तान है, एक प्यार का नगमा है, खुब सुरत हसीना, चुप गये सारे नजारे, जाने कहॉ गये ओ दिन, मेरे मितवा मेरे मित्र रे, परदेसीया ऐ सच है प्रिया, तर मराठीत रेश्माच्या रेघांनी व मी डोलकर डोलकर दर्याचा राजा अशी एका पेक्षा एक गीते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायक कलाकारांच्या पहिल्याच कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची उत्तम साथ लाभली. कार्यक्रमाचा शेवट हम किसी से कम नही सिनेमातील मेडलीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सर्वेसर्वा श्री कानडे यांनी मुकेश,रफी ,किशोर , पंचम ,शाहीर साबळे यांच्या सर्वांच्या आवाजात गाणी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवले तर श्री मिलिंद पाताडे , नीलम भोगटे , अनिता शरण , स्वाती देशमुख , ज्योती धीवर हेमंत वायाळ, यांची ही गाणी हिट झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पेडणेकर यांनी माहीतीपूर्वक केले तर कार्यक्रमाला मनोज पवार व मंगेश मोरे यांचे संगीत दिग्दर्शन लाभले. स्वर साधना कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनी मानले.