ठाण्याची 15 मे रोजीची पाणीकपात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 03:50 PM2019-05-14T15:50:25+5:302019-05-14T15:52:03+5:30

ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत उद्या बुधवार दिनांक 15 मे 2019 रोजी करण्यात येणारी पाणी कपात तूर्त रद्द करण्यात आली आहे.

thaanayaacai-15-mae-raojaicai-paanaikapaata-radada | ठाण्याची 15 मे रोजीची पाणीकपात रद्द

ठाण्याची 15 मे रोजीची पाणीकपात रद्द

googlenewsNext

ठाणे (14) : ठाणे महानगरपालिका व स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत उद्या बुधवार दिनांक 15 मे 2019 रोजी करण्यात येणारी पाणी कपात तूर्त रद्द करण्यात आली आहे. सदरची कपात ही शुक्रवार 17 मे 2019 रोजी सकाळी 9.00 ते शनिवार दिनांक 18 मे 2019 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत अशी 24 तास करण्यात येणार आहे.

या दिवशी स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. यांची मीरा भाइशदरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी व ठाणे महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी साकेत येथील रुस्तमजी टॉवरच्यासमोर स्लुस व्हॉल्व्ह व प्लेटद्वारे एकत्र करण्यात आलेली आहे. परंतु, सदर स्लुसव्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होत असल्यामुळे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे.

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करुन ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: thaanayaacai-15-mae-raojaicai-paanaikapaata-radada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.