विधानसभेसाठी ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये आघाडीत जुंपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:39 PM2019-07-09T23:39:19+5:302019-07-09T23:39:26+5:30

इच्छुकांची भाऊगर्दी : काँगे्रस-राष्ट्रवादीत अनेक दावेदार

Thackeray for the assembly will be winners in the alliance of Meera-Bhayander | विधानसभेसाठी ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये आघाडीत जुंपणार

विधानसभेसाठी ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये आघाडीत जुंपणार

Next

ठाणे : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू झाली असून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली आहे. दुसरीकडे मीरा-भार्ईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीने मांडले होते. ते सत्यात उतरल्यास इच्छुकांचे अवासान गळणार असले तरी ही जागा काँग्रेस सोडणार नाही, असा प्रयत्न या निमित्ताने केला गेल्याची चर्चा मात्र ऐकायलामिळत आहे.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले असून त्यात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांनी भाऊगर्दी केल्याचे दिसत आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढल्याने काँग्रेसला १५ हजार ८८३ मते मिळाली होती. जी त्या आधीच्या निवडणुकीपेक्षाही कमी होती. २०१४ पूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला येथून ३६ हजार २८८ मते मिळून निसटता पराभव झाला होता. परंतु,मागील निवडणुकीत मोदी लाट असल्याने त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, तो मागील निवडणुकीत भाजपने सर केला होता. तर काँग्रेस आणि राष्टÑवादीचे येथे पानीपत झाले होते.
आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सचिन शिंदे, रवींद्र आंग्रे, मिलिंद खराडे आदींसह अन्य तीन चार जणांनी उमेदवारी या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. यापैकी कोणाच्या पारड्यात तिकीट जाणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. परंतु, दुसरीकडे या मतदारसंघात राष्टÑवादी मात्र काँग्रेसच्या आड येणार असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीने काँग्रेसला मीरा भार्इंदरची जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात ठाणे शहर मतदार संघ आपल्याला मिळावा अशी मागणी केली होती.

आघाडीत धुमश्चक्री
ठाणे विधानसभा राष्ट्रवादीसाठी सोडणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्टÑवादीत धुमश्चक्री उडणार हे निश्चित मानले जात आहे. इच्छुकांची भाऊगर्दी पाहता या जागेसाठी वरिष्ठांवर दबाव आणण्याचे हे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Thackeray for the assembly will be winners in the alliance of Meera-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.