"मुंबई टोलमुक्तीला ठाकरे सरकारचा नकार; बारामतीला न्याय अन् ठाण्यावर अन्याय"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:04 PM2020-09-04T14:04:14+5:302020-09-04T14:05:03+5:30
भाजपा आमदार संजय केळकर यांचा आरोप
ठाणे : मागील कित्येक महिन्यापासून ठाण्याच्या हद्दीतील ठाणोकरांना टोलमुक्तीसाठी विविध पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र त्याकडे शासनाने मात्र दुर्लक्षच केले असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुंबई प्रवेशद्वार हा हलक्या वाहनांना टोल मुक्त करा, जास्त आर्थिक परतावा करावा लागत असेल तर 04 क्र मांकाच्या वाहनांना पहिल्या टप्प्यात टोल मुक्त करा, या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, तसेच हिवाळी अधिवेशनात ही हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याचे लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने 9 मिहन्यांनी मिळाले असून त्यात टोल मुक्तीला स्पष्ट पणो नकार दिला आहे. त्यामुळे ठाणोकरांच्या तोंडाला पुन्हा एकदा पानेच पुसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.
आर्थिक स्थितीचे कारण या लेखी उत्तरात दिले असून बारामतीला एक न्याय तर ठाण्यावर अन्याय असं का.? असा संतप्त सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे. बारामतीला काही कोटींचा परतावा देऊन टोल मुक्त केले करण्यात आले आहे. ज्या ठाण्यातील नेत्यांनी टोल मुक्तीसाठी आंदोलन केले, तेच आता टोल मुक्तीला नकार देत आहेत हे ही ठाणोकरांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून आमचा क्4 टोल मुक्तीचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. सत्ताधा:यांकडूनच अशा प्रकारे ठाणोकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. एमएच 04 वाहनांना टोलमुक्ती मिळावी यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आली आहेत, तसेच शासनाकडूनही वारंवार टोलमुक्ती दिली जाईल असे सांगण्यात आले होते. परंतु आता अचानक टोलमुक्ती देणो शक्य नसल्याचे सांगून ठाकरे सरकाराने ठाणेकरांची घोर फसवणूक केल्याचेही त्यांनी सांगितले.