ठामपाच्या शाळा होणार हायकेट

By admin | Published: August 20, 2016 04:48 AM2016-08-20T04:48:50+5:302016-08-20T04:48:50+5:30

लोकमतने प्रदीर्घ मालिकेद्वारे ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर सुरूवातीला त्यांच्या दुरूस्ती आणि डागडुजीसह नव्या शाळा बांधण्यासाठी

Thackeray's school will become a hightet | ठामपाच्या शाळा होणार हायकेट

ठामपाच्या शाळा होणार हायकेट

Next

ठाणे : लोकमतने प्रदीर्घ मालिकेद्वारे ठाणे महापालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर सुरूवातीला त्यांच्या दुरूस्ती आणि डागडुजीसह नव्या शाळा बांधण्यासाठी ३९ कोटींची तरतूद करणाऱ्या प्रशासनाने आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नवीन कृतीयुक्त अध्ययन प्रणाली, सेमी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब, १० शाळांमध्ये संगणक लॅब, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सिग्नल, शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा, दोन रात्रशाळा हे महत्त्वाचे प्रकल्पचे सुरू केले आहेत.
शुक्रवारी महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, सभागृह नेते अ‍ॅड. अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते त्यांची अंमजबजावणी करण्यात आली.
२०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये शाळा हायटेक आणि आधुनिक सोयीसुविधा देण्याबाबतची घोषणा आयुक्तांनी केली होती. या सर्व पाच प्रकल्पांची सुरूवात शुक्रवारी झाली. यातील पहिल्या प्रकल्प कोलशेतच्या शाळा क्र मांक ५२ मधील इंग्रजी माध्यमात सुरू केला. या शाळेमध्ये पॅडॉलॉजीवर आधारीत कृतीयुक्त अध्ययन पद्धतीच्या प्रशिक्षण प्रणालीचे उद्घाटन झाले. टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि परिसर आशा या स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी १ ली ते ५ वीच्या एकूण ५ शाळा घेतल्या असून या शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्यही परिसर आशा या संस्थेने दिले आहे.
तर मानपाडा येथील शाळा क्र मांक ६४ येथे स्मार्ट सेमी इंग्रजी शाळेचे उद्घाटन करण्यात आले. येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पहिलीच्या वर्गातील मुलांना शिकविण्यात येणार आहे. समूह अध्ययन पद्धतीचा अवलंब करून टॅबच्या माध्यमातून १० गट शाळेतील १५० विद्यार्थ्यांना येथे शिकविण्यात येणार आहे. यासाठी सेव्ह दी चाईल्ड या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेमी इंग्रजी शाळेतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे.
केप जेमिनी तसेच आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थांतर्फे ठाणे महानगरपालिकेच्या २८ शाळांमध्ये संगणक लॅब आणि ई क्लास प्रणाली सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्र माची सुरूवात खारीगाव येथील मनपाच्या शाळेतून झाली. यानंतर पारिसकनगर येथील शाळा क्र मांक ६८ येथे रात्र शाळेचे उद्घाटन करण्यात आले. कळवा आणि मनोरमानगर येथे ही रात्रशाळा सुरू केली आहे.

सर्वात उपयुक्त उपक्र म म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली सिग्नल शाळा. पोटा-पाण्यासाठी सतत भटकंती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्र म अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेष म्हणजे रोजगारासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी या विद्यार्थ्यांच्या पालकांना महापालिकेच्यावतीने व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना येथे रोजगाराची साधने उपलब्ध होतील. या सिग्नल शाळेच्या ठिकाणी खेळण्यासाठी मैदान, खेळण्यासाठी उपकरणे, संगणकांची व्यवस्था, खेळणी आणि ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Web Title: Thackeray's school will become a hightet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.