ठाण्यात रंगला सखी महोत्सव २०१७

By admin | Published: April 29, 2017 01:39 AM2017-04-29T01:39:08+5:302017-04-29T01:39:08+5:30

लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला.

Thakin Rangala Sakhi Festival 2017 | ठाण्यात रंगला सखी महोत्सव २०१७

ठाण्यात रंगला सखी महोत्सव २०१७

Next

ठाणे : लोकमत सखी मंच आयोजित पॉवर बाय बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव २०१७ मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवारी ठाण्यातील वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या महोत्सवाला महिलावर्गाचा उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी मेहंदी, वेशभूषा, पाककला तसेच एकल नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्यावतीने स्वाभिमान या विशेष मोहिमेंतर्गत महिलांना सशक्तीकरणाचे धडे देण्यात आले.
सखींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धाआणि आकर्षक बक्षीसांची लयलूट बक्षीसांची लयलूट, हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. कला, नृत्य क्षेत्रातील तज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये टॅन्ट्रम अ‍ॅकेडमीचे चंद्रकांत रायकर, स्वरा फुड्सच्या अनुश्री जोशी, आरती शिंदे, उमा बनसोडे या परिक्षकांचा समावेश होता. एकल नृत्याकरिता ५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.
या स्पर्धेत स्नेहा काटे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर अश्विनी पाठक यांनी दुसरा क्रमांक आणि उमा पराते यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. वेशभूषा स्पर्धेत राजश्री शिरसाट या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर रसिका मेंगळे द्वितीय आणि स्वाती कर्णेकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मेहंदी स्पर्धेत रंजना पगार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर निलिमा सावळे यांनी द्वितीय आणि प्रतिमा दिक्षित यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पाककला स्पर्धेत मनिषा चितळे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर सुलभा विचारे यांना दुसऱ्या आणि उमा देशमुख यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमात लोकमत सखी मंच परिवारातील महिला सभासदांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत विविध कला सादर केल्या. सखी मंचच्या माध्यमातून मिळालेल्या या व्यासपीठामुळे उपस्थित सखींनी लोकमतचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमादरम्यान बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्या वतीने स्वाभिमान ही विशेष मोहिम राबविण्यात आली. कमीत कमी वेळा जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल. कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी स्वत:चे अनुभव मांडत इतर महिलांना करिअर घडविण्याची प्रेरणा दिली. उपस्थित महिलांसाठी प्रश्न मंजुषाच्या माध्यमातून बक्षीसे जिंकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. बिर्ला सनलाईफच्या वतीने महिलांना प्रेरणा देण्याकरिता विशेष चित्रफीत या ठिकाणी दाखविण्यात आली. या समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित महिलां सशक्तीकरणाचे धडे देत एक उत्तम करिअर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Thakin Rangala Sakhi Festival 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.