ठाण्यातील रस्ते रात्रीही दिसणार एकदम चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:41 AM2018-09-21T03:41:10+5:302018-09-21T03:41:13+5:30

स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्रमांकावर असलेला रँक ४० वर आला असला, तरी त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.

Thakne road will be visible at night | ठाण्यातील रस्ते रात्रीही दिसणार एकदम चकाचक

ठाण्यातील रस्ते रात्रीही दिसणार एकदम चकाचक

Next

ठाणे : स्वच्छ भारत अभियानात ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्रमांकावर असलेला रँक ४० वर आला असला, तरी त्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरु वात केली आहे.
यात शहराच्या मुख्य रस्त्यांची सफाई दिवसा होत असली, तरी रात्रीच्या स्वच्छतेसाठीही या अभियानामध्ये गुण असल्याने आता मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांची सफाई रात्रीच्या सत्रातही करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यासाठी खाजगी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यामुळे आता दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेत रस्ते चकाचक दिसण्यास मदत होणार आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २० लाखांच्या घरात आहे. शहरात दररोज चार लाख नागरिकांची येजा असते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील रत्स्यांवर निर्माण होणाऱ्या कचºयामध्येदेखील वाढ होत आहे. ठाणे महापालिकेकडे कायमस्वरूपी २२१२ सफाई कामगार आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येनुसार ही संख्या अपूर्ण असल्याने सकाळच्या सत्रात मुख्य रस्त्यांची सफाई खाजगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला असला, तरी आता स्वच्छ भारत अभियानामधला रँक वाढवण्यासाठी रात्रीच्या सत्रामध्येदेखील वाणिज्य आस्थापना असलेल्या मुख्य रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. यासाठी खाजगी कामगारांची नियुक्ती केली जाईल.
>ठेका वर्षभरासाठी दिला जाणार
रात्रीच्या सत्रात काम करण्यासाठी खाजगी कामगारांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक खर्च चार कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित असून तो महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. हा ठेका वर्षभरासाठी दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. खाजगीकरणातून रस्तेसफाई या लेखाशीर्षकांतर्गत यासाठी निधी प्रस्तावित केला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Thakne road will be visible at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.