ठाकुर्लीच्या त्या २५० झाडांची कत्तल होणार!
By admin | Published: August 27, 2015 12:07 AM2015-08-27T00:07:20+5:302015-08-27T00:07:20+5:30
ठाकुर्लीतील मध्य रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडांची कत्तल करण्यावर महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. दीड वर्षापासूनच्या या प्रलंबित
डोंबिवली : ठाकुर्लीतील मध्य रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडांची कत्तल करण्यावर महापालिकेचे आयएएस आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. दीड वर्षापासूनच्या या प्रलंबित
विषयासह अन्य विषयांसंदर्भात महापालिकेत झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वनप्रेमी अशोक वैद्य आणि भाजपा गटनेते नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी त्यास कडाडून
विरोध केला, परंतु त्यास न
जुमानता त्या दोघांचा विरोध, अशीच नोंद करत अन्य सदस्यांच्या मताने रवींद्रन यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.
आयुक्तांच्या या निर्णयाला चौधरी-वैद्य यांनी विरोध केला. पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच अशी कत्तल होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केडीएमसीतील डोंबिवलीचा प्रदूषणात देशात १४ वा क्रमांक असून राज्यात दुसरा आहे. विविध कारणांमुळे हरित लवादानेही येथील कंपन्यांना कोट्यवधींची पेनल्टी सुनावली आहे.
ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाच आणखी ऱ्हास होणारा हा निर्णय घाईने घेण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर सचिवांनी मतदान घ्यावे आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असा आग्रह चौधरींनी केला. परंतु, सचिव सुभाष भुजबळ यांनी निर्णय घेण्याअगोदरच एका सदस्याने त्यास मोडता घालत विरोध करून आयुक्तांना निर्णय घेण्यास भाग पाडल्याची टीकाही त्यांनी केली.
(प्रतिनिधी)
आयुक्तांचा जावईशोध..
या वेळी माहिती देताना आयुक्त म्हणाले की, रेल्वेचा त्या ठिकाणी होणारा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. तसेच तेथे जी झाडे आहेत, त्यापासून केवळ टिंबर मिळेल.
उरला प्रश्न आॅक्सिजनचा, तर त्यातून केवळ २ टक्क्याहून कमी आॅक्सिजन मिळेल.
खरा आॅक्सिजन हा सागरी परिसरातून मिळत असतो. असे स्पष्टीकरण देत त्यास मंजुरी दिल्याचे चौधरी म्हणाले.
मात्र, समुद्रापासून मिळणारा आॅक्सिजन हे पहिल्यांदाच ऐकण्यात आले असून ज्ञानात भर पडल्याचे चौधरी म्हणाले.
तसेच आयुक्तांच्या या माहितीबद्दल जावईशोध अशी खोचक टीकाही त्यांनी केली.