ठामपा मतदानासाठी सज्ज

By admin | Published: February 15, 2017 04:41 AM2017-02-15T04:41:08+5:302017-02-15T04:41:08+5:30

ठाणे महापालिकेने आता निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून कर्मचाऱ्यांना प्रात्याक्षिके सादर केल्यानंतर आता निवडणूक केंद्राच्या

Thampa ready for voting | ठामपा मतदानासाठी सज्ज

ठामपा मतदानासाठी सज्ज

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने आता निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून कर्मचाऱ्यांना प्रात्याक्षिके सादर केल्यानंतर आता निवडणूक केंद्राच्या ठिकाणची आखणी पालिकेने सुरू केली आहे. महापालिका हद्दीत १७०४ मतदान केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी आता तयारी पूर्ण झालेली आहे. शिवाय यासाठी १० ते १५ मतदान केंद्रांसाठी क्षेत्रीय अधिकारी आणि १० हजार कर्मचारी अशी व्यवस्था केली आहे.
३३ प्रभागातील १३१ जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यासाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी, ३६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १७०४ मतदान केंद्र, १० ते १५ मतदान केंद्रांसाठी क्षेत्रीय अधिकारी आणि १० हजार कर्मचारी अशी व्यवस्था केली आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदान करताना नागरिकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक विभागाने मतदान कसे करावे, या संदर्भात चित्रफितींच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरू केले आहे.
याशिवाय, नागरिकांना मतदान करण्यासाठी जवळचे मतदान केंद्र उपलब्ध व्हावे म्हणून ७५० मतदारांसाठी एक केंद्र उभारण्यात येणार आहे. दोन किमीच्या परिघामध्येच ही केंदे्र उभारली जाणार आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीत प्रत्येक वेळेस अंदाजे ५० ते ५५ टक्केच मतदान होत आहे. परंतु, यंदा हा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेने विविध योजना हाती घेतल्या आहेत. पोस्टर आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून जनजागृती सुरु केली असून पथनाट्याच्या माध्यमातूनही मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. याशिवाय महापालिका शाळांमधून विद्यार्थ्यांद्वारे पालकांना मतदान करण्यासाठी प्रेरीत करण्याचे कामही केले जात आहे.
निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महापालिका मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर तक्र ार निवारण कक्ष उभारला आहे. तसेच सोशल मिडीयावर उमेदवारांची जाहिरात करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक केले असून त्यासाठी मुख्यालयात केंद्र उभारले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thampa ready for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.