ठामपाकडून हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीस बजावण्यास सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 05:05 PM2017-09-28T17:05:01+5:302017-09-28T17:05:16+5:30
कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरून महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे.
ठाणे - कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरुन महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आतार्पयत सुमारे 362 आस्थापनांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यानंतर आता या नोटिशीनंतर पुढील आठवडय़ात कारवाईची दिशी ठरविली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिका हद्दीतील 500 चौरस फुट क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या जागेत सुरू असलेल्या बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवर कारवाई करताना त्यांना 7 दिवसांची नोटीस देण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. या आदेशान्वये त्यांनी ज्या आस्थापनांकडे अग्निशमन विभागाचा वैध दाखला नाही, ज्या आस्थांपनांकडे वैध दाखला आहे पण आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार विहित नमुन्यातील फॉर्मं बी सादर केलेला नाही, ज्या आस्थापनांकडे अग्निशमन विभागाचा वैध दाखला आहे, आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार विहित नमुन्यातील फॉर्मं बी ही सादर केलेला आहे. परंतू अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यामध्ये नमुद केलेल्या अटी आणि शर्थीची पुर्तता करण्यात आलेली नाही,त्याचप्रमाणो आस्थापनाच्या ठिकाणी मंजुरीव्यतिरिक्त नियमबाह्य अंतर्गत व बाह्य बदल करून नियमांचे उल्लघंन करण्यात आलेले आहे अशा आस्थापनांवर कायद्यतील तरतुदींनुसार 7 दिवसांची नोटीस देवून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
त्यानुसार कोठारी कंपाऊंडमधील अनाधिकृत गाळेधारकांबाबत महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमाचे कलम 260 व 267 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आतार्पयत या भागातील सुमारे 362 आस्थापनांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता या आस्थापनांना आपल्या बाजू स्पष्ट करायच्या आहेत. परंतु पुढील आठडय़ापासून पालिका येथील आस्थापनांवर कारवाई करण्यास सुरवात करणार आहे.