ठाण्याच्या रुद्र प्रतिष्ठानने येऊरमध्ये राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 10:39 PM2018-05-01T22:39:38+5:302018-05-01T22:39:38+5:30
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येऊरच्या डोंगरात ठाण्याच्या रुद्र प्रतिष्ठानसह युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्वच्छता अभियान राबविले. यात तरुण तरुणींनी कचरा गोळा करुन एक वेगळा आदर्श ठेवला.
ठाणे: महाराष्टÑ दिनानिमित्त येऊर हिल्स परिसरात रुद्र प्रतिष्ठान आणि सीबीटी संस्थेद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सुमारे २०० स्वयंसेवकांनी प्लास्टीक, काच आणि इतर कचऱ्याची मंगळवारी साफसफाई केली.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तसेच या जनजागृतीसाठी रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंगळवारी सकाळी ७ ते १० या दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये दी संस्कार एजुकेशन चेरिटेबल ट्रस्ट, संस्कार क्लासेस आणि ठाणे महापालिकेनेही विशेष सहभाग घेतला. या मोहीमेमध्ये येऊर हिल्स परिसरातील प्लास्टिक आणि काचेच्या शेकडो बाटल्या स्वयंसेवकांनी गोळा केल्या.
रु द्र प्रतिष्ठानचे सल्लागार धनंजय सिंह, नगरसेवक पूर्वेश सरनाईक , रु द्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनयकुमार सिंह, सीबीटी चे गणेश सिंह , .आदित्य पाटिल आणि गौरव राठोड यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी तसेच जयंत पटनायक, किशोर भानुशाली, राजन बनसोडे ,समीर डोळे आणि सुरेंद्र भारद्वाज आदींनी या मोहीमेमध्ये सहभाग घेतला. पर्यावरण प्लास्टीक मुक्त करण्यासाठी हे स्वच्छता अभियान राबविल्याचे धनंजय सिंह यांनी सांगितले.