ठाणे १४ ठिकाणी तुंबण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:04 AM2019-04-25T01:04:54+5:302019-04-25T01:05:02+5:30

पावसाळ्यासाठी पालिका सज्ज; २६ ठिकाणे आहेत दरडप्रवण

Thane 14 Threats to Tinker | ठाणे १४ ठिकाणी तुंबण्याची भीती

ठाणे १४ ठिकाणी तुंबण्याची भीती

Next

ठाणे : एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिका येणाऱ्या मान्सूनचा सामना करण्यासाठी तयारी करत आहे. त्यानुसार, पावसाळ्यात पाणी तुंबणाºया १४ संभाव्य ठिकाणांची यादी तयार केली आहे. तसेच दरड कोसळू शकणाºया २६ ठिकाणांची दुसरी यादीही पालिकेने जाहीर केली आहे.

महापालिकेने केलेल्या सर्व्हेत १४ ठिकाणे अशी आढळली आहेत, जिथे यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठू शकणार आहे. काही वर्षांपूर्वी हा आकडा २६ च्या घरात होता. परंतु, पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे तो कमी झाला आहे. त्यानुसार, शहरातील राममारु ती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटीस पुलाखाली, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज, देवनायर सोसायटी, गजानन महाराज चौक, देवधर रु ग्णालय, जिजामाता मार्केट, पम्पिंग स्टेशन, चव्हाण चाळ, वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक, घोडबंदर रोड, विटावा सबवे आणि दिवागाव परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. तर, प्रभाग समितीनिहाय ठिकाणांमध्ये नौपाडा- ८, उथळसर- २, माजिवडा-मानपाडा- २, कळवा- १, मुंब्रा- १ आदींचा समावेश आहे.

दुसरीकडे पालिका हद्दीत २६ ठिकाणांवर पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबत महापालिका प्रशासनाने तेथे राहणाºया नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, तरीही येथे रहिवासी आजही वास्तव्य करताना दिसत आहेत. समितीनिहाय दरड कोसळणाºया ठिकाणांमध्ये रायलादेवी- १२, माजिवडा-मानपाडा- २, कळवा- ६, मुंब्रा- ५ आणि वर्तकनगर- १ अशा भागांचा समावेश आहे. यामध्ये संतोषनगर, पाटीलनगर, डक्टलाइन, रेल्वेवसाहत, सेंट उलाई शाळा, हनुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रूपादेवी, भास्करनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केणीनगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिकनगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळीपाडा, गुरुदेव आश्रम व उपवन आदी ठिकाणांचा समावेश आहे.

Web Title: Thane 14 Threats to Tinker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.