ठाणे लोकसभेसाठी २०२ मतदानकेंद्रे क्रिटिकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:33 AM2019-04-25T01:33:54+5:302019-04-25T01:34:18+5:30

मतदानकेंद्रांचे लाइव्ह प्रक्षेपण; एकूण २ हजार ४५२ केंद्रे, इन कॅमेरा मतदानही होणार

Thane 202 polling centers for the Lok Sabha! | ठाणे लोकसभेसाठी २०२ मतदानकेंद्रे क्रिटिकल!

ठाणे लोकसभेसाठी २०२ मतदानकेंद्रे क्रिटिकल!

Next

ठाणे : पोलीस यंत्रणेसह निरीक्षक व निवडणूक यंत्रणांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार ४५२ मतदानकेंद्रांपैकी २०२ केंदे्र क्रिटिकल म्हणून घोषित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे या मतदारकेंद्रांसाठी जादा पोलीस बळासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ), मतदानकेंद्रांचे लाइव्ह प्रक्षेपण, मतदारांचे छायाचित्रीकरण, इन कॅमेरा मतदान आदींची खास उपाययोजना केली जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सेंटर मॅजिस्टिक आणि पोलीस यांच्यातील एकमताने ठाणे लोकसभेच्या क्रिटिकल मतदानकेंद्रांची निवड करण्यात आली. या क्रिटिकल मतदानकेंद्रांसाठी विविध निकष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मतदानकेंद्रांवर गेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले असावे. यातील ७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास हा निकष विचारात घेतला आहे. याप्रमाणेच मतदानकेंद्रात जास्तीतजास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र असणे, एकाच परिवारातील मतदार एकत्र येण्याऐवजी एकेक करून (सिंगल व्होटर) मतदान केलेल्या मतदारांची संख्या जास्त असणे, रेसिडेन्सिअल मतदार जास्तीतजास्त असणे इत्यादी निकषांवर हे क्रिटिकल मतदानकेंद्र निश्चित केले आहे.

यंदा निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांत २०२ क्रिटिकल मतदानकेंद्रे घोषित झाली आहेत. यामुळे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघांत क्रिटिकल केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. ठाणे मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही २०२ मतदानकेंद्रे ११६ ठिकाणी आहेत. यामध्ये मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात ३४ मतदानकेंद्रे क्रिटिकल आहेत. याप्रमाणेच ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ३५, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ३०, ठाणे विधानसभा मतदारसंघात २७, ऐरोलीत ३७ आणि बेलापूरमध्ये ३९ मतदानकेंद्रे क्रिटिकल म्हणून घोषित केली आहेत.

मुंब्रा, दिव्यातील ५९ मतदानकेंद्रे संवेदनशील
मुंब्रा : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाºया मुंब्रा, दिव्यात मतदानासाठी एकूण २३८ मतदानकेंद्रे आहेत. त्यापैकी ५९ केंद्रे संवेदनशील आहेत. यामध्ये मुंब्य्रातील ४७ आणि दिव्यातील १२ मतदानकेंद्रांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला केंंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाºयांच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.

Web Title: Thane 202 polling centers for the Lok Sabha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.