Thane: आपला दवाखान्याच्या २२ जागा झाल्या निश्चित, ६८ ठिकाणी उभारले जाणार, राज्य शासनाचा उपक्रम

By अजित मांडके | Published: October 16, 2023 04:04 PM2023-10-16T16:04:48+5:302023-10-16T16:05:16+5:30

Thane News: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे.

Thane: 22 hospital beds have been confirmed, 68 places will be set up, an initiative of the state government | Thane: आपला दवाखान्याच्या २२ जागा झाल्या निश्चित, ६८ ठिकाणी उभारले जाणार, राज्य शासनाचा उपक्रम

Thane: आपला दवाखान्याच्या २२ जागा झाल्या निश्चित, ६८ ठिकाणी उभारले जाणार, राज्य शासनाचा उपक्रम

- अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात यापूर्वीच आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ च्या आसपास आपला दवाखाना सुरु आहेत. त्यात मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून एका ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. त्यात आता ६७ दवाखान्यांची भर पडणार आहे. त्यातील २२ ठिकाणच्या जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ठाण्यातील झोपडपट्टी भागातील नागरीकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाण्यातही आपला दवाखाना महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. त्यानुसार शहरातील ४५ ठिकाणी सध्या आपला दवाखाना सुरु आहे. याची वेळ सांयकाळी ५ ते रात्री १० एवढी आहे. परंतु त्याचा लाभ गोरगरीब नागरीकांना मिळत आहे. अगदी येऊर पासून ते थेट दिव्या पर्यंत हे जाळे निर्माण करण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार, ईसीजी, रक्त तपासणी, औषधे आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आता आपला दवाखाना ही संकल्पना सुरु केली आहे. त्यानुसार ठाण्यातही काही महिन्यांपूर्वी रामनगर भागात आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. दुपारी दोन ते रात्री १० वाजेपर्यंत हा दवाखाना सुरु असतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार आता शहरातील सर्वच भागात असे दवाखाने सुरु करण्यासाठी जागांचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे. त्यात २२ जागा निश्चित झाल्या आहेत. उर्वरीत ४६ जागांचा शोधही सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

या आहेत २२ जागा
खिडकाळी, दातीवली, साबेगाव, सैनिक नगर, अमिनाबाद, एमटीएमएल कंपाऊंड, संजय नगर, रामनगर, हाजुरी, गांधी नगर, येऊर, बामनोई पाडा, कळवा, मानपाडा, सावरकरनगर, वागळे इस्टेट, ढोकाळी, दिवा आदी ठिकाणे निश्चित झाली आहेत.

Web Title: Thane: 22 hospital beds have been confirmed, 68 places will be set up, an initiative of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.