ठाण्यात दोन महिन्यात उन्मळून पडले ३३९ वृक्ष, १५० वृक्ष झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:12 PM2019-07-09T18:12:24+5:302019-07-09T18:14:46+5:30

ठाणे महापालिका हद्दीत सध्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन महिन्यात शहरात ३३९ वृक्ष उन्मळून पडले असून १५० हून अधिक वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. पावसात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

In Thane, 339 trees and 150 trees were damaged after two months | ठाण्यात दोन महिन्यात उन्मळून पडले ३३९ वृक्ष, १५० वृक्ष झाले धोकादायक

ठाण्यात दोन महिन्यात उन्मळून पडले ३३९ वृक्ष, १५० वृक्ष झाले धोकादायक

Next
ठळक मुद्देसिमेंट कॉंक्रीटीकरण, खोदकामामुळेच घडतात प्रकारदरवर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करा

ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत मोठ्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्ता रु ंदीकरण करत असतांना झाडांच्या मुळांवर देखिल घाव सोसावे लागत आहे. मात्र, यामुळे झाडे निर्जीव होवून झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात मागील दोन महिन्यात ३३९ वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना यामुळेच घडल्या असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
             ठाणे शहरात झपाट्याने होणारे नागरीकीकरण, हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या मोहिमेमुळे शहारतील ठिकठिकाणी खोदकामे सुरु असून यामध्ये अनेकदा झाडांची मुळांवर देखिल घाव बसत आहे. तसेच पावसाळ्यापुर्वी करण्यात येणारी छाटणी व्यविस्थत होत नाही, झाडांना ठोकण्यात येणारे खिळे, झाडांच्या खोडांना सिंमेंटचा विळखा यामुळे त्यांना प्राण वायू मिळत नाही. परिणामी झाडे निर्जिव होवून ते उन्मळण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जून महिन्याच्या पंधरवड्यानंतर सुरु झालेल्या दमदार पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला असतानाच पाऊस आणि सोसाटयाच्या वाऱ्यामुळे शहरातील झाडांना याचा मोठ्या प्रमाणत फटका बसला असून झाडे उन्मळून पडण्याच्या, झाडांच्या फांद्या तुटणे, झाडांची स्थिती धोकादायक होणे आदी प्रकार मोठया प्रमाणात घडत आहेत. दरम्यान, ठाणे महानगरपालिका हद्दीत मे ते ०८ जुलै २०१९ या कालावधीत ३३९ झाडे उन्मळण्याच्या, झाडांच्या फांद्या पडण्याच्या २३४ तर १५० झाडे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

झाडे उन्मळून पडण्यामागे सिमेंट-कॉंक्रीटीकरण, खोदकाम, झाडांची योग्य पध्दतीने न होणारी छाटणी, झाडांना खिळे ठोकणे यामुळे झाडे निर्जीव होवून कोसळण्याच्या घटना वाढत आहे. विविध पक्षाचे राजकीय पुढारी, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत वृक्षारोपणाचे कार्यक्र म घेण्यात येत असतात. हे कार्यक्र म केवळ फोटो काढण्यापुर्ते सिमीत न राहता, त्या झाडांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करून त्याच्या स्थितीचा अढावा घेणे अपेक्षित आहे.
- डॉ. सुर्यकांत येरागी, पर्यावरण तज्ञ



 

 

Web Title: In Thane, 339 trees and 150 trees were damaged after two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.