ठाणे : दडविलेल्या बारबालांसह ४७ जणांना अटक
By admin | Published: October 28, 2015 11:21 PM2015-10-28T23:21:28+5:302015-10-28T23:21:28+5:30
येथील सिडको बसथांब्याजवळील ‘मधुर मनीष रेस्टॉरंट अॅण्ड बार’वर परिमंडळ-१ ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकून नऊ
ठाणे : येथील सिडको बसथांब्याजवळील ‘मधुर मनीष रेस्टॉरंट अॅण्ड बार’वर परिमंडळ-१ ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकून नऊ बालांसह ४७ जणांना अटक केली. तर, मुंब्य्रातील हुक्का पार्लरमधून ६५ जणांना अटक केली आहे.
‘मधुर मनीष’ बारमध्ये विहित वेळेपेक्षा जास्त वेळ महिला वेटर सर्व्हिस ठेवल्याबाबत तसेच अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. तिच्या आधारे उपायुक्तांच्या पथकाने २७ आॅक्टोबर रोजीच्या मध्यरात्री १२ ते १ वा.च्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी तेथील मुली ग्राहकांशी अश्लील वर्तन करताना तसेच कागदी बनावट नोटांचा चलनी नोटांप्रमाणे वापर करीत असल्याचे आढळले. या कारवाईत नऊ महिला, पाच पुरुष वादक आणि गायक, ११ पुरुष वेटर, २१ ग्राहक आणि एक बार व्यवस्थापक यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मुंब्रा भागातील चुहा ब्रिजजवळ असलेल्या ‘किंग्ज फॅमिली अॅण्ड फ्रेण्ड्स ढाबा’ येथे २७ आॅक्टोबर रोजी याच पथकाने छापा टाकून बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविणाऱ्या ६५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र तंबाखूविरोधी अधिनियमानुसार कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
च्या बारमध्ये जादा मुली असल्याचे पोलिसांना समजू नये म्हणून बारचा मालक आणि व्यवस्थापकाने बारमधील हॉलच्या स्वच्छतागृहात तयार केलेल्या एका छुप्या पोकळीत पाच मुलींना दडवून ठेवले होते.
च्अत्यंत अरुंद जागेमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असतानाही त्यांना असुरक्षितपणे कोंबण्यात आले होते. याप्रकरणीही बारच्या मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध कलम ३०८ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
च्दीड महिन्यापूर्वी माजिवड्यातील ‘हनिकाँब’ या बारमध्येही अशाच प्रकार मुलींना दडविल्यानंतर पोलिसांनी अशाच प्रकारे कारवाई केली होती.