ठाण्यात आठ महिन्यांत पडली ५८५ झाडे; मुसळधार पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 02:41 PM2021-09-18T14:41:12+5:302021-09-18T14:45:02+5:30

ठाणे : शहरात मागील आठ महिन्यांत ५८५ झाडे उन्मळून पडली. यातील काही घटनांमध्ये दोघांना नाहक आपला जीव गमवावा लागला ...

In Thane, 585 trees fell in eight months | ठाण्यात आठ महिन्यांत पडली ५८५ झाडे; मुसळधार पावसाचा तडाखा

ठाण्यात आठ महिन्यांत पडली ५८५ झाडे; मुसळधार पावसाचा तडाखा

Next

ठाणे : शहरात मागील आठ महिन्यांत ५८५ झाडे उन्मळून पडली. यातील काही घटनांमध्ये दोघांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे तर, १३ जण बचावले असून, काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. ज्या झाडांच्या केवळ फांद्या पडल्या होत्या त्यांचीही स्थिती धोकादायक झाली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील झाडाजवळून जाताना खबरदारी घ्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केली जाते. त्याचवेळी दुसरीकडे रस्त्यालगतची शेकडो झाडे ही पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यांमुळे उन्मळून पडतात. पावसाळ्याप्रमाणे इतर ऋतूंमध्येही झाडांची हीच अवस्था होते.  त्यामुळे जानेवारी ते ३ सप्टेंबर २०२१ या आठ महिन्यांत ५८५ लहान-मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. यामध्ये २९० झाडांच्या फांद्या पडल्या असून, २२५ झाडांची स्थिती धोकादायक झाली आहे. 

अनेकदा ही झाडे घरांवर तसेच रस्त्यावर उभ्या किंवा धावणाऱ्या वाहनांवर पडली आहेत. त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पादचाऱ्यांच्याही अंगावर पडल्याने ते जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  मागील आठ महिन्यांत वागळे इस्टेट, वर्तकनगर, माजीवडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि नौपाडा-कोपरी या प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी दोन घटना घडल्या आहेत. 

नौपाड्यात  दोघांचा बळी 

नौपाडा - कोपरीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण जखमी झाला असून, इतर चार प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी दोघे जण जखमी झाले आहेत. 

उन्हाळ्यातही पाच घटनांची नोंद 

पावसाळ्याप्रमाणे उन्हाळ्यातही सर्वाधिक झाडे उन्मळून पडली. यातील पाच घटनांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला आहे, तर चौघे जण जखमी झाले. 

Web Title: In Thane, 585 trees fell in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे