Thane: इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन
By अजित मांडके | Published: September 8, 2023 04:07 PM2023-09-08T16:07:10+5:302023-09-08T16:07:23+5:30
Thane: ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे.
- अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे. यातून महापालिका कर्मचाºयांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी मोफत चार्जींगची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आपल्यापासूनच सुरवात करणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा फायदा पालिका कर्मचाºयांना होणार असून ते देखील इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्यावर भर देतील असा विश्वास पालिकेला वाटत आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात पहिल्या टप्यात १० ठिकाणी इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जींग स्टेशन उभारणार आहे. त्याअनुंषगाने कामही सुरु झाले आहे. परंतु ठाणेकरांचा कल इलेक्ट्रीक वाहनांकडे झुकण्यासाठी महापालिका आता या मोहीमेची स्वत:पासून सुरवात करणार आहे. त्या अनुषंगाने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. यातून पालिका कर्मचाºयांना इलेक्ट्रीक वाहने घेण्यासाठी प्रोत्साहन केले जाणार आहे.
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातही यातून होणाºया प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्याबरोबर पेट्रोल, डिझेलवर होणाºया खर्चाला देखील या माध्यमातून आळा बसेल असा विश्वास पालिकेला वाटत आहे. आज महापालिकेतील कर्मचाºयांकडे पेट्रोलवरील दुचाकी आहेत. परंतु त्यांनी इलेक्ट्रीक वाहन घेतल्यास त्यांचा पेट्रोलवरील खर्च देखील यामुळे वाचणार आहे. महापालिका यासाठी मोफत चार्जींग उपलब्ध करुन देणार आहे.
त्यानुसार पहिल्या टप्यात ठाणे महापालिका मुख्यालय, वर्तकनगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती आणि नितिन फायर स्टेशन याठिकाणी ७ चार्जींग स्टेशन उभारले जाणार आहेत. त्यात काही स्लो तर काही फास्ट चार्जींगचे स्टेशनचा समावेश असणार आहे. यासाठी १९ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार त्याची निविदा देखील काढण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाने दिली. येत्या डिसेंबर पर्यंत हे चार्जींग स्टेशन सुरु होणार आहेत.
महापालिका मुख्यालय - १० किलो व्हॅटचे १ आणि २२ किलो व्हॅटचे १
नितीन फायर स्टेशन - १० किलो १, २२ किलो १
वर्तकनगर - १० किलो १ ३० किलो १
माजिवडा - १० किलो १ चार्जींग स्टेशन असणार आहे.