ठाण्यात ८५ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:57+5:302021-06-04T04:30:57+5:30
ठाणे : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश देण्यासाठी गुरुवारी ठाण्यात आयोजित केलेल्या ...
ठाणे : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश देण्यासाठी गुरुवारी ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ८५ दात्यांनी रक्तदान केले. वंजारी समाजातर्फे हे शिबिर आयोजिले होते.
कोरोना काळात समाजबांधवांनी आजतागायत साडेसात हजार जेवणाचे डबे मोफत वाटले आहेत. त्यांच्या या समाजकार्याचा पुढचा भाग म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष गजानन आंधळे यांनी सांगितले. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे संस्थापक धनराज गुट्टे आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे अमोल गीते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंजारी समाजातील शिवाजी वाघ, संदीप चकोर, दीपक नागरे, विमल पाटील आदी उपस्थित होते. आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनीही उपस्थिती लावली. ठाणे नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय अजित बडे यांनीदेखील रक्तदान केले.
------------
फोटो मेलवर