ठाणे : प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत
By अजित मांडके | Updated: July 8, 2024 16:16 IST2024-07-08T16:13:43+5:302024-07-08T16:16:17+5:30
ठाणे : वागळे इस्टेट, पडवळ नगर भागातील शिवनेरी सोसायटीच्या बाजूला असलेल्या अंजिक्यतारा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुमच्या हॉलमधील प्लास्टरचा काही ...

ठाणे : प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत
ठाणे : वागळे इस्टेट, पडवळ नगर भागातील शिवनेरी सोसायटीच्या बाजूला असलेल्या अंजिक्यतारा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुमच्या हॉलमधील प्लास्टरचा काही भाग पडल्याची घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली. यात २ वर्षीय स्मित पवार याच्या पायाला दुखापत झाली.
सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास, अंजिक्यतारा सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील संदेश पवार यांच्या रुमच्या हॉलमधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. यावेळी घरात असलेल्या त्यांच्या दोन वर्षीत स्मित पवार याच्या पायावर काही भाग कोसळला. यात त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तळ अधिक चार मजल्यांची ही इमारत असून ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. ही इमारत सी २ बी या गटात मोडत असून ती दुरुस्त करता येण्यासारखी आहे.