Thane: उल्हासनगरात १८ लाखाचे सोने घेऊन पलायन, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: March 29, 2024 07:24 PM2024-03-29T19:24:00+5:302024-03-29T19:24:23+5:30
Ulhasnagar Crime News: उल्हासनगर कॅम्प नं-२ येथील सोनार गल्लीतील व्यापाऱ्याने सोन्याचे ब्रेसलेट बनविण्यासाठी दिलेले १८ लाखाचे सोने घेऊन बासू फकिरा याने पलायन केले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होऊन, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-२ येथील सोनार गल्लीतील व्यापाऱ्याने सोन्याचे ब्रेसलेट बनविण्यासाठी दिलेले १८ लाखाचे सोने घेऊन बासू फकिरा याने पलायन केले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होऊन, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२ शिरू चौक परिसरातील सोनार गल्लीत बासू फकिरा हा सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. सोन्याचे ब्रेसलेट दागिना बनविण्यासाठी सोनार गल्लीतील अजिजुल कुर्बानअली रहमान यांनी १८ लाख रुपये किंमतीचे ३०० ग्राम वजनाचे सोने १८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी अजीजुल यांच्याकडे दिले होते. मात्र ब्रेसलेट दागिना बनवून न देता त्याने येथून पळून जात अजीजुल रहमान यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. अखेर उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यावर पोलिसांनी बासू फकिरा याच्यावर १८ लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.