मुंब्य्रामध्ये दोन गोदामांना लागलेल्या आगीत लाकडे आणि पुठ्ठे जळून खाक, लाखोंचं नुकसान
By कुमार बडदे | Published: April 28, 2024 09:40 AM2024-04-28T09:40:50+5:302024-04-28T09:41:25+5:30
Mumbra Fire News: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले.
- कुमार बडदे
मुंब्रा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील दोन गोदामांना लागलेल्या आगीत एका गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे तर दुस-या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे जळून खाक झाले. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गा जवळील उत्तर-शिव भागातील गोठेघर परीसरातील पाँवर हाऊस जवळ असलेल्या दोन पत्र्याच्या गोदामांना रविवारी मध्यरात्री एक वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आग लागली.याबाबतची माहिती मिळताच शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन,नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी तसेच दोन फायर वाहने आणि एक जेसीबीच्या सहाय्याने अथक प्रयत्नांनी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी आग पूर्णपणे विझवली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु बारा बाय ४० फूट आकाराच्या गोदामा मधील तीन टन पुठ्ठे आणि अफजल चौधरी यांच्या ३० बाय ५० फूट आकाराच्या गोदामा मधील ९ टन जळावू लाकडे जळून खाक झाली.अशी माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.