Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 6, 2023 05:32 PM2023-09-06T17:32:38+5:302023-09-06T17:34:34+5:30

Thane: समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

Thane: A teacher should become a "mother" and teach - Deepak Nagargoje | Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - आमच्या शांतीवन आश्रमात जेव्हा नुकताच जन्मलेल्या बाळाला घेऊन मुली येतात...आमच्याकडे बाळाला सोपवून पळुन जाण्याचा प्रयत्न करतात.. अंधारात लपून बसतात...कधीकधी बेवारस बाळ सापडतात. तेव्हा वाटतं की, आई वर लिहिलेल्या मराठी साहित्यातील सगळ्या कविता पाण्यात बूडवून टाकाव्यात... असे भावविभोर अनुभव कथन करता- करता बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे हळवे होतात. ते समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 'विचारमंथन' व्याख्यानमालेचे नववे पुष्प 'वेगवेगळया सामाजिक आणि परिस्थितीमधील विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे अनुभव, सध्याची शिक्षण स्थिती आणि नागरिक घडविण्याच्या प्रवासातील शिक्षकांचे योगदान' या विषयावर मान्यवरांनी गुंफले. या परिसंवात वंचित, निराधार, बेघर लेकारांचे संगोपन शिक्षण यासाठी कार्य करणारे बीड येथील शांतीवन संस्थेचे संस्थापक नागरगोजे, ठाण्यातील सिग्नल शाळेच्या प्रकल्प्रमुख आरती परब, श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या उपप्राचार्या ग्लॅडिज कॉब्राल, बालहक्क, शिक्षण या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पत्रकार यामिनी सप्रे सहभागी झाले होते. या मान्यवरांची मुलाखत आकाशवाणीचे वृत्तनिवेदक राजेंद्र पाटणकर यांनी घेतली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांचा सत्कार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते ग्रंथबुके देवून करण्यात आला.

ऊसतोडणी कामगारांचा प्रश्न समजून घेतला, ऊसतोडीसाठी मुलांना शिक्षण सोडावे लागते. ऊसतोड मजुरांच्या वेदना असंख्य आहेत, त्या जाणून घेतल्या. ऊसतोडीवर गेलेल्या बाईच्या आणि लेकरांच्या लैंगिक शेषणाच्या कित्येक घटना या दडपून टाकल्‌या जात असल्याचं लक्षात आले. अशा कित्येक घटनांना वाचा फोडण्याचे काम शांतिवनच्या माध्यमातून हाती घेतले. पंधरा वर्षाच्या आत आई होवून विधवा झालेल्या मुली एकटीने जगण्याचा संघर्ष करताना भेटल्या. परिस्थितीमुळे मुलीची जबाबदारी घ्यायला नको म्हणून जन्माला येण्याअगोदारच त्यांना खुडून टाकणाऱ्या हतबल माताही दिसल्या. मुन सुन्न करणारे भयाण वास्तव पाहिले असल्याचे  नागरगोजे यांनी नमूद केले. या शोषित कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारमध्ये बसलेल्यांनीही गांभिर्याने पाहिले नाही तर कितीतरी जबाबदार घटकांनी या प्रश्नाला सोईस्कररित्या बाजूला ठेवले असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली अर्थव्यवस्था ८० टक्के कृषीवर अवलंबून आहे, असे असताना गडचिरोलीपासून मुंबईपर्यत किंवा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यतच्या प्राथमिक शिक्षण विभागात कृषी हा विषय शिकवला जात नाही. शेती करा असे सांगतो आणि शेतीचे शिक्षण देत नाही. शेतीवर शिक्षण देणारी शिक्षणव्यवस्था नसल्याचे त्यांनी नमूद केली. यासाठी शांतीवनमध्ये जैन एरिगेशन यांच्या सहयोगाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेती हा विषय शिकवतो, आज ही मुले चांगल्या पध्दतीने शेती करण्याचे शिक्षण घेतात. १५ वर्षापूर्वी आमचा हा प्रयोग शासनानेही स्वीकारली असून शासनानेही प्रगतीवर्ग सुरु केले असल्याचे दीपक नागरगोजे यांनी नमूद केले. मुलांवर संस्कार करणारे सर्वोत्तम साहित्य सानेगुरूजीचे असून ते मुलांना चांगल्या पध्दतीने समजते असे ते म्हणाले.

Web Title: Thane: A teacher should become a "mother" and teach - Deepak Nagargoje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.