Thane: भिवंडीत अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यात पालिकेसमोरील झाड कोसळले, अनेक घरांवरील पत्रे उडाले...
By नितीन पंडित | Published: July 13, 2024 07:31 PM2024-07-13T19:31:15+5:302024-07-13T19:31:46+5:30
Thane News: भिवंडी शहरात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत असतानाच अचानक जोरदार वारा आला आणि या वाऱ्या मध्ये महापालिका समोरील रस्त्यावरील एक झाड उन्मळून पडले. सतत रहदारीने व वाहनांनी गजबजलेल्या महापालिके समोरील रस्त्यावर हे झाड उन्मळून पडले.
- नितीन पंडित
भिवंडी - शहरात सकाळपासून पावसाच्या सरी बरसत असतानाच अचानक जोरदार वारा आला आणि या वाऱ्या मध्ये महापालिका समोरील रस्त्यावरील एक झाड उन्मळून पडले. सतत रहदारीने व वाहनांनी गजबजलेल्या महापालिके समोरील रस्त्यावर हे झाड उन्मळून पडले. सुदैवाने त्यावेळी कोणते ही वाहन किंवा कोणी पादचारी त्याठिकाणी नव्हता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी येऊन हे झाड तोडून हा रस्ता मोकळा केला आहे.तर गायत्री नगर नागाव या भागात पोलिस चौकी ते दुर्गा मंदिर या परिसरात २५ ते ३० घरांवरील पत्रे लोखंडी अँगल उडाले.या मुळे अनेक घरांमध्ये असलेले साहित्य,धान्य कपडे भिजल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.