ठाण्यात तीन हजार ७२३ रिक्षांवर  उगारला कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:35 AM2020-11-21T00:35:56+5:302020-11-21T00:36:09+5:30

कोरोना नियमांचे उल्लंघन : वाहतूक पोलिसांचा दणका

In Thane, action was taken against 3,723 rickshaws | ठाण्यात तीन हजार ७२३ रिक्षांवर  उगारला कारवाईचा बडगा

ठाण्यात तीन हजार ७२३ रिक्षांवर  उगारला कारवाईचा बडगा

googlenewsNext

 

n  लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करणाऱ्या एक हजार ३३५ वाहनांविरुद्ध सहा लाख ६७ हजारांचा दंड आकारला आहे. तसेच कोरोनाचे नियम धुडकावून दोनपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तीन हजार ७२३ रिक्षाचालकांविरुद्ध १८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिली.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मेट्रो लाइन ४च्या कामासाठी मुख्य रस्त्यांवर बॅरीकेडिंग केली आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी होऊन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. 
अशा वेळी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेला सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये व्यावसायिकांनी त्यांची बंद वाहने सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी केली आहेत. त्यामुळेच सेवा रस्त्यावरील दुतर्फा वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडेही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच रस्ते वाहतुकीस मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
 त्याअंतर्गत १ ते १८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये सेवा रस्त्यावरील तब्बल एक हजार ३३५ अनधिकृत उभ्या केलेल्या वाहनांच्या मालकांविरुद्ध ई-चलनाद्वारे, जामर्स आणि टोईंग व्हॅनद्वारे वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध पथकांनी सहा लाख ६७ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
पाेलिसांच्या या कारवाईने रिक्षाचालकांमध्ये घबराट पसरली असून यापुढेही अशीच कारवाई  सुरु राहणार असल्याचे संकेत वाहतूक शाखेने दिले.

सेवारस्ते वाहतुकीला मोकळे ठेवा
nसेवारस्त्यांवर दुकाने तसेच इमारतीच्या बाजूला असलेल्या भागात वाहने उभी करण्यास मुभा आहे. मात्र, महामार्गालगतच्या भागात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सेवा रस्ता वाहतुकीला मोकळा ठेवण्याचे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.
nरिक्षाचालकांकडूनही चालकांशेजारी तसेच मागेही दोनपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राहण्यासाठी चालकासह तिघांनाच परवानगी आहे. त्यामुळे एका विशेष मोहिमेंतर्गत तीन हजार ७२३ रिक्षाचालकांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांतील १८ युनिटने दंडात्मक कारवाई केली.

Web Title: In Thane, action was taken against 3,723 rickshaws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.