Thane: जि.प.कडून १५१ अतिरिक्त पदविधर शिक्षकांचे उपशिक्षक म्हणून समायाेजन!
By सुरेश लोखंडे | Published: August 26, 2023 07:36 PM2023-08-26T19:36:50+5:302023-08-26T19:37:22+5:30
Thane: ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील प्राथमिक शाळेचे तब्बल १५१ शिक्षक संचमान्यतेव्दारे अतिरिक्त ठरले आहेत.
ठाणे - जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील प्राथमिक शाळेचे तब्बल १५१ शिक्षक संचमान्यतेव्दारे अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना समावून घेण्याची गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेने येथील एम. एच हायस्कूल येथे शुक्रवारी उशिरापर्यंत त्यांचे समुपदेशन करून विविध शाळांमधील रिक्त जागी अखेर त्यांचे समायाेजन करण्यात आले आहे. या पदविधर शिक्षकांना आता उपशिक्षक म्हणून नियुक्ती आदेश जारी झाले आहेत.
जिल्हह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. त्यामध्ये ८१ हजार ७०० पेक्षा अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजशास्त्र विषयास अनुसरून २०१४ मध्ये या पदवीधर शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली हाेती. मात्र २०२२-२३ च्या संचमान्यतेतून हा समाजशास्त्र विषय वगळण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील शाळांमधील हे १५१ शिक्षक अतिरिक्त ठरले हाेते. िजिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे, अशा शाळांचा शाेध घेऊन त्या जागी या शिक्षकांचे समायाेजन करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध शाळांवर पदवीधर शिक्षक म्हणून या शिक्षकांनी नऊ वषेर् विद्यार्थ्यांना शिकवले आहे. मात्र या पदविधर शिक्षकाना आता उपशिक्षक म्हणून शाळांवर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंताेष आहे. एम.एच हायस्कूलच्या सभागृहात या शिक्षकांचे समायाेजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आणि शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिक्षकांचे समुपदशेन करून त्यांची रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मात्र शिक्षकांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यास प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही.