Thane: बदलापूरनंतर अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नऊ वर्षाच्या मुलीचा शौचालयात नेत विनयभंग
By पंकज पाटील | Published: August 22, 2024 03:24 PM2024-08-22T15:24:51+5:302024-08-22T15:25:19+5:30
Ambarnath Crime News: बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
- पंकज पाटील
अंबरनाथ - बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने 21 ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
'' या घटनेची तक्रार येतात लागली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला देखील तत्काळ अटक करण्यात आली आहे न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
- जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक