Thane: 'राज्यपालांकडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते', उदय सामंत यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:49 PM2022-04-12T14:49:54+5:302022-04-12T14:55:32+5:30

Uday Samant: विद्यापाठीतही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यानुसार त्याचा प्रस्ताव देखील तयार करु. परंतु त्याची फाईल मंजुर करुन घेण्यासाठी तो प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवावे लागेल. मात्र राज्यपालाकंडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते असा आमचा अनुभव असल्याची मार्मिक टिका राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री उदय सामंत यांनी केली.

Thane: 'After the file goes to the governor, it takes more days', says Uday Samant | Thane: 'राज्यपालांकडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते', उदय सामंत यांचा खोचक टोला

Thane: 'राज्यपालांकडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते', उदय सामंत यांचा खोचक टोला

Next

ठाणे  - विद्यापाठीतही अशा प्रकारचे युवा साहित्य संमेलन व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यानुसार त्याचा प्रस्ताव देखील तयार करु. परंतु त्याची फाईल मंजुर करुन घेण्यासाठी तो प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवावे लागेल. मात्र राज्यपालाकंडे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते असा आमचा अनुभव असल्याची मार्मिक टिका राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यामुळे या प्रस्तावाची फाईल मंजुर करण्यासाठी वेळ पडल्यास मधु मंगेश कर्णिक यांना घेऊन जाऊ किमान त्यामुळे तरी फाईल लवकर मंजुर होईल अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणोकर येथे आयोजित दुस-या युवा साहित्य संमलेनाच्या प्रमुख पाहुणे  म्हणून ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समेवत खासदार श्रीकांत शिंदे, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, कोमसपाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव, स्वागत अध्यक्ष नरेश म्हस्के आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही कोपरखळी लगावली. संमेलनाचे अध्यक्ष पद निवडायचे झाल्यास यापूर्वी तीन तीन महिने त्याचे खलबते उडायचे. कोण अध्यक्ष होणार, त्याचा कार्यकाळ काय, किती पुस्तके लिहीली हे आम्ही वाचत असतो. परंतु युवा साहित्य संमेलनाच्या ठिकाणी ही निवड बिनविरोध करण्यात आली. हे चांगल्याचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होण्यासाठी आणि करण्यासाठी जे जे काही चालते ती आम्ही तीन महिने बघत असतो. कोण कीती चांगला आहे, कोण कीती वाईट हे आम्ही वृत्तपत्र वाचून ठरवत असतो. परंतु हा पायंडा जो पाडला तो सर्वच संमेलनांनी घ्यावा असे वयक्तीक मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. साहित्यामध्ये किंवा साहित्यकामध्ये निवडणुक कसली करायाची, निवडणुक आम्ही करतो ते बस झाले, त्यात साहित्यकांमध्ये, नाटय़संमेलन अध्यक्षसाठी निवडणुक करायची परंतु त्यामुळे अध्यक्ष पदाचा मान हा तीन महिने आधीच संपलेला असतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यापुढील संमेलन हे रत्नागिरीला करुया अशी मागणही त्यांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या स्तरावर प्रत्येक कलाकांराची साहित्यकांची स्मारके तयार झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. वाचन संस्कृती टिकते की नाही, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सुरु असलेली वाचनालये बंद का पडतात, याचाही विचार करायला हवा. दिंडीत मुले सहभागी त्याच्या नंतर काय होणार आहे, त्यांच्या र्पयत साहित्य पोहचले पाहिजे, साहित्य कसे व्यक्त होणार आहे, याचा विचार होणो गरजेचे आहे. तरुण पिढीने आयटीमध्ये गेले पाहिजे, इंजिनिअरींग झाले पाहिजे. परंतु याच तरुण पिढीने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे कामही हे साहित्य करीत आहे, आणि त्यात तरुण पिढी सहभागी होत हे चांगल्याचे ध्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विचार केल्यास याला देखील एक राजकीय वारसा आहे, परांपरा आहे आणि ती कुठे तरी लोप पावत असतांना अशा प्रकारच्या संमेलनाचे आयोजन केले जात आहे ही चांगली बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. तरुण पिढीची हे विचार सर्वापर्यंत पोहचावयचे असतील तर प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर अशी संमेलने होणो गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यापीठात दर वर्षी युवा साहित्य संमेलन व्हावे, जेणो करुन विद्यापीठातील तरुण कर्तृत्व देशासमोर येईल. त्यातून साहित्याची नवीन पिढी तयार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परंतु साहित्य संमेलन घ्यायचे झाल्यास त्याची परवानगी राज्यपालांकडे घ्यावी लागते. परंतु राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवेन, परंतु हल्ली तेथे फाईल गेल्यावर जास्त दिवस थांबते हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे वेळ प्रसंगी मधु मंगेश कर्णिक यांना घेऊन जाईन, त्यामुळे किमान साहित्याची तरी फाईल जास्त वेळ ठेऊ नये अशी विनंती आपण करु अशी मार्मिक टिका त्यांनी यावेळी केली. साहित्य संमेलन झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही तर आपली जबाबदारी वाढली हे लक्षात ठेवा, तरुणांना भविष्यात काय देणार आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. कोमसपसाची चांगली पुस्तके महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पाठविण्याची जबाबदारी स्विकारत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकारण्यांचे कवी संमेलन एकदा घ्या..
राजकारण्यांचे कवी संमेलन एकदा घ्या अशी विनंती देखील त्यांनी यावेळी करत, त्याचे अध्यक्ष कोण असतील हे तुम्हाला माहित आहे, यावरुन सभागृहात एकच हशा पिटला. परंतु मी नाव कोणाचे घेतले नाही, नाव घेऊन माझी कुठे चौकट येईल असे मी करत नसल्याची कोपरखळी देखील त्यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांना लगावली. राजकारणी देखील कवी बनत चालले आहेत, त्यांना देखील, व्यासपीठ आपण तयार करुया असे सांगत पुन्हा अध्यक्ष कोण असेल हे तुम्हाला माहित आहे. परंतु राजकारण्यांनी देखील यात पुढे आले पाहिजे असे देखील त्यांनी मत व्यक्त केले.

हे जग नात्यांवर चालले आहे. मलबार हिलवर ज्या ठिकाणी मंत्री राहतात आणि ज्या ठिकाणी मुकेश अंबानीचा बंगला आहे, त्याठिकाणी स्फोटके ठेवले म्हणून त्याच्यावर समाज जगत नाही. तर समाज सर्वसामान्य माणसांच्या भावनांवर जगत असतो. त्यामुळे भावना जोपसणो, ती समृध्द करणो गरजेचे असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. स्त्रीयांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारता इतकी वाईट वागणूक इतर कोणत्याही देशात दिली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. आज सक्षम तर सोडून द्या, स्त्रीयांच्या संरक्षणाचा मुद्दा देखील सुटु शकलेला नाही. समाज बिल्डींगवर जगत नाही, स्टॉक एक्सचेंजवर जगत नाही. समाज जगतो परस्परांच्या भावनांवर, विश्वासावर, सहाकार्यावर, संवदेनशीलतेवर असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Thane: 'After the file goes to the governor, it takes more days', says Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.