ठाण्यात अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिवल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:49 AM2018-02-21T00:49:00+5:302018-02-21T00:49:00+5:30
किल्ल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, किल्ले संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी अनुलोम, स्वत्त्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय या संस्थांनी एक पाऊल उचलले
ठाणे : किल्ल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, किल्ले संवर्धन आणि जतन व्हावे यासाठी अनुलोम, स्वत्त्व, प्रयास परिवर्तन आणि फोकाय या संस्थांनी एक पाऊल उचलले आहे. याची सुरुवात घोडबंदर किल्ल्याने होत असून यासाठी या किल्ल्यावर अश्वमेध घोडबंदर फोर्ट फेस्टिवल आयोजिला आहे. यावेळी विविध स्पर्धा या फेस्टिवलचे मुख्य आकर्षण असतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
रविवार ४ मार्च रोजी घोडबंदर किल्ल्यावर हा महोत्सव होत आहे. दुपारी दोन ते पाच यावेळेत विविध स्पर्धा आयोजिल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये इच्छुकांना विनामूल्य प्रवेश आहे. तिथीने येणाºया शिवजयंतीचे औचित्य साधून घोडबंदर गावातून किल्ल्यापर्यंत सायंकाळी सायकल रॅली आणि शोभायात्रेचे आयोजन व इतर कार्यक्र म होणार आहेत. सायंकाळी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा विजेत्यांचे आणि नामवंत कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. ज्यात लोकनृत्य, पोवाडा, वक्तृत्व आणि किल्ल्याचा इतिहास सांगणारा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात घोडबंदर गावचे नागरिक बहुसंख्येने पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. स्पर्धांमध्ये नावनोंदणीची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी आहे. आॅनलाईन फॉर्म भरून आपली नावे नोंदवू शकतात. स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी ँुाी२३@ॅें्र’.ूङ्मे या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शाहिर निशांत अमर शेख, चित्रकार विजयराज बोधनकर, मंदार आणि प्रिती वाळुसकर, नृत्यांगना प्रज्ञा कोळी भगत अशा ३० हून अधिक नामवंत परिक्षकांचा सहभाग आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कल्याण ते वसई दरम्यान असलेल्या जुन्या बंदरांवर आणि किल्ल्यांवर एक प्रकाशझोत टाकला जाईल आणि त्या सर्व ठिकाणाच्या जतन संवर्धनाची एक ब्लू प्रिंट तयार करता येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.