कोरियामध्ये ठाण्याच्या ऍथलिट डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांनी उत्कृष्ट कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:08 PM2023-05-17T19:08:53+5:302023-05-17T19:09:02+5:30
विशाल हळदे ठाणे - आशिया पॅसिफिक मास्टर गेम्स जिओनबुक, कोरिया 2023 या अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याच्या डॉ. हेता ठक्कर-राय आणि ...
विशाल हळदे
ठाणे- आशिया पॅसिफिक मास्टर गेम्स जिओनबुक, कोरिया 2023 या अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याच्या डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
डॉ. हेता ठक्कर-राय हिने तीन स्पर्धांमध्ये ३ सुवर्णपदक पटकावले. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटरमध्ये ३ सुवर्णपदके जिंकल्याबद्दल हेताचे अभिनंदन होत आहे. अमित प्रभू यांनी ८०० मीटरमध्ये सुवर्ण आणि ४०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. अशाप्रकारे या दोघांनी एकूण ४ सुवर्ण आणि १ रौप्यपदक पटकावले. ज्यांनी प्रोत्साहन दिले तसेच पाठिंबा दिला त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
हेता हिने ३० वर्ष वयोगटामध्ये तर अमित प्रभू यांनी ४५ वर्ष गटामध्ये भाग घेतला होता. एम्स स्पोर्टस् फाऊंडेशनचे संस्थापक व प्रशिक्षक डॉ. अजित कुलकर्णी यांच्याकडे हे दोघेही प्रशिक्षण घेत आहेत. श्री माँ गुरुकुल आणि वसंत विहार क्लब हाऊस मैदानावर हे दोघे सराव करतात. डॉ. हेता ठक्कर-राय या डॉ. अजित कुलकर्णी यांच्याकडे गेली २३ वर्षे सराव करत आहेत. दोघांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतली असल्याचे डॉ. अजित कुलकर्णी यांनी सांगितले.