Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल

By अजित मांडके | Published: December 17, 2022 03:17 PM2022-12-17T15:17:10+5:302022-12-17T15:17:40+5:30

Thane: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे  बंद पुकारण्यात आला होता.

Thane bandh of Hindutva organizations, Balsaheb's Shiv Sena and BJP supported, Thanekar's plight | Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल

Thane: हिंदुत्ववादी संघटनांचा ठाणे बंद, बाळसाहेबांची शिवसेना आणि भाजपने दिला पाठिंबा, ठाणेकरांचे हाल

Next

- अजित मांडके

ठाणे - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संतांच्या विरु द्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून वारकरी संप्रदायाकडून शनिवारी ठाणे  बंद पुकारण्यात आला होता. या बंदमुळे ठाण्यातील मुख्यबाजारपेठसह, शहरातील इतर भागातील दुकाने व इतर सेवा बंद होत्या. तर काही ठिकाणच्या शाळांनी विद्याथ्र्याचे हाल होऊ नयेत म्हणून शाळाही बंद ठेवल्या होत्या. सकाळ सत्रत स्टेशन परिसरात रिक्षा व इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद होती. तर वारक:यांनी अंधारे यांच्या विरोधात निषेध रॅली काढली होती. या रॅलीला बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने पाठींबा दिल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजेर्पयत बंदची हवा दिसून आली. त्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले.

सुषमा अंधारे व त्यांना पाठीशी घालणा:या नेत्यांच्या विरोधात शनिवारी ठाणे मधील हिंदुत्ववादी संघटनांनी ठाणे बंदची हाक दिली होती. यावेळी दुपारी १२ च्या सुमारास मुख्य बाजारपेठेत असलेल्या विठ्ठल मंदिराजवळून वारक:यांनी लॉंग मार्च काढला होता. यावेळी हरिनामाचा गजर करीत, हाती टाळ चिपळ्या घेऊन हा निषेध व्यक्त करण्यात आला. या लॉंग मार्चमध्ये बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने देखील सहभाग घेतला होता. यावेळी, सुषमा अंधारे यांनी केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला असून त्याला आम्ही पाठींबा दिल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दुसरीकडे बंदचे पडसाद सकाळ पासूनच शहरात दिसून आले. मुख्य बाजेरपेठेसह शहरातील इतर भागातील विविध आस्थापना बंद होत्या. तर या बंदमध्ये दुकानदार व इतर आस्थापांनीनी उत्सुर्फतपणो सहभाग घेतला असल्याचा दावा आंदोलनकत्र्यानी केला. सकाळच्या सत्रत रिक्षा व इतर सार्वजनिक वाहतुकही बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. स्टेशन परिसरातून जाणा:या रिक्षा देखील थांबविण्यात आल्या होत्या.

प्रवाशांना बसमधून उतरवले
ठाणे बंदची हाक दिली असतांना एलबीएस मार्गावरुन येणा:या बेस्टच्या बस रहेजा तिनहात नाका भागात शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी अडविल्याचे चित्र दिसून आले. तसेच प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. तसेच रिक्षा देखीब बंद करण्यात आल्या.

काही शाळा राहिल्या बंद
ठाणो बंदचा फटका विद्याथ्र्याना बसू नये यासाठी शहरातील काही खाजगी शाळांनी स्वत:हून शनिवारी सुट्टी जाहीर केली. त्यामुळे विद्याथ्र्याचे हाल वाचल्याचे दिसून आले. परंतु काही शाळांमध्ये शनिवारी विद्याथ्र्याचा शेवटचा पेपर होता. परंतु सुट्टी जाहीर झाल्याने हा पेपर आता सोमवारी घेतला जाणार आहे.

दिव्यातही बंद
दिव्यातही दिवा भाजपकडून बंद पाळण्यात आला. या बंदला दिव्यातील जनतेने प्रतिसाद दिला. दिवा भाजप व हिंदू संघटना यांच्याकडून सुषमा अंधारे यांच्या प्रतिमात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

दुपारी १ नंतर सर्व व्यवहार सुरळीत
हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठाणे बंदची हवा ही दुपारी १ वाजेर्पयत दिसून आली. १२ वाजता निषेध रॅली काढण्यात आली. ती १ च्या सुमारास विसर्जीत झाल्यानंतर टप्याटप्याने शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठसह इतर भागातील आस्थापना देखील सुरु झाल्याचे दिसून आले.

राजकीय पुढा-यांचा भरणा
हिंदुत्ववादी संघटना तसेच वारक:यांनी काढलेल्या निषेध रॅलीत वारकरी कमी आणि राजकीय पुढा:यांचाच भरणा अधिक दिसून आला. भाजपच्या मंडळींच्या हातात तर निषेधाचे फलक होते, त्यावर भाजपचे कमळ फुलल्याचे दिसत होते. तर प्रत्येक राजकीय पुढाक:याच्या डोक्यावर वारक:यांची टोपी दिसून येत होती.

श्राध्द घालत केले पिंडदान
यावेळी लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महिला आघाडीने व इतर पदाधिका:यांनी जांभळी नाका येथे सुषमा अंधारे यांच्या विचारांचे श्रध्द घालत पिंडदान केले.

Web Title: Thane bandh of Hindutva organizations, Balsaheb's Shiv Sena and BJP supported, Thanekar's plight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.