Thane: भंडार्ली कचरा प्रकल्प ३१ ऑगस्ट पासून होणार कायमचा बंद

By अजित मांडके | Published: August 3, 2023 07:10 PM2023-08-03T19:10:40+5:302023-08-03T19:11:02+5:30

Thane: मागील कित्येक वर्षे चर्चेत असलेला डायघर कचरा प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने परंतु तो सुध्दा टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेला अखेर या निमित्ताने हक्काचे डम्पींगही उपलब्ध झाले आहे.

Thane: Bhandarli Garbage Plant will be closed permanently from August 31 | Thane: भंडार्ली कचरा प्रकल्प ३१ ऑगस्ट पासून होणार कायमचा बंद

Thane: भंडार्ली कचरा प्रकल्प ३१ ऑगस्ट पासून होणार कायमचा बंद

googlenewsNext

- अजित मांडके 
ठाणे - ठाणे महापालिकेचा भंडार्ली येथील कचरा प्रकल्प पुढील १५ सप्टेंबर पर्यंत बंद केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिकांना दिले होते. त्यानुसार महापालिकेने त्याची तयारी केली असून आता १५ सप्टेंबर नाही तर ३१  ऑगस्ट पासून भंडार्ली येथील कचरा प्रकल्प टप्याटप्याने कायमचा बंद होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली. तर मागील कित्येक वर्षे चर्चेत असलेला डायघर कचरा प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने परंतु तो सुध्दा टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेला अखेर या निमित्ताने हक्काचे डम्पींगही उपलब्ध झाले आहे.

ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पींग नसल्याने मागील काही वर्षे महापालिका दिवा येथे कचरा डम्प करीत होती. परंतु त्याला विरोध झाल्याने अखेर दिड वर्षापूर्वी येथील डम्पींग कायमचे बंद करण्यात आले. त्यानंतर डायघरचा प्रकल्प सुरु करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु त्याठिकाणी देखील स्थानिकांचा विरोध दिसून आला. दिव्यातील विरोध लक्षात घेऊन महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात भंडार्ली येथे कचरा टाकण्यास सुरवात केली होती. हा प्रकल्प केवळ एक वर्षासाठी होता. परंतु वर्षभरानंतरही हा प्रकल्प सुरु राहिल्याने आणि पावसाळ्यात त्याचा त्रास येथील रहिवाशांना झाल्याने अखेर स्थानिकांनी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात महापालिकेत धडक दिली होती. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यांना १५ सप्टेंबर पर्यंत तेथील प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या शिष्ठमंडळाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी देखील तेच आश्वासन येथील स्थानिकांना दिले होते.

परंतु आता १५ सप्टेंबर नाही तर ३१ ऑगस्ट हा भंडार्ली येथे कचरा टाकण्याचा शेवटचा दिवस असणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानंतर येथील कचरा महापालिकेच्या हक्काच्या डम्पींगमध्ये टाकला जाणार आहे. ठाणे महापालिकेचे डायघर येथे कचरा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न सुमारे १४ वर्षानंतर प्रत्यक्षात उतरत आहे. त्यानुसार येत्या १ सप्टेंबर पासून याच ठिकाणी संपूर्ण क्षमतेने येथे कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरु केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

३१  ऑगस्ट पासून भंडार्ली येथील कचरा प्रकल्प हा टप्याटप्याने बंद केला जाणार आहे. परंतु १ सप्टेंबर पासून डायघर येथे देखील टप्याटप्याने कचरा टाकला जाणार आहे. १५ सप्टेंबर पासून येथील प्रकल्प संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जाणार आहे. सध्या १ सप्टेंबर पासून पहिल्या टप्यात डायघर येथे टाकल्या जाणा-या कच-यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर दुसºया टप्यात वीज निर्मिती केली जाणार आहे.
- प्रशांत रोडे
(अतिरिक्त आयुक्त, ठामपा)

Web Title: Thane: Bhandarli Garbage Plant will be closed permanently from August 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.