Thane: भाजपच्या ठाणे जिल्हा कार्यकारणीत मोठे फेरबदल, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
By अजित मांडके | Published: August 30, 2023 05:17 PM2023-08-30T17:17:58+5:302023-08-30T17:18:13+5:30
Thane: भाजपच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संजय वाघुल यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारणी देखील बदलण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या नव्या कार्यकराणीत ज्यांनी आधीच्या कालावधीत काम केले नसेल त्यांना घरी बसविले जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते.
- अजित मांडके
ठाणे - भाजपच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी संजय वाघुल यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर कार्यकारणी देखील बदलण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर या नव्या कार्यकराणीत ज्यांनी आधीच्या कालावधीत काम केले नसेल त्यांना घरी बसविले जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार नव्या कार्यकारणीत ६० टक्के नव्या चेहºयांना संधी देत ४० टक्के जुनेच चेहरे पुन्हा या कार्यकारणीत दिसून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदाच्या कार्यकारणीत ७० टक्के नवीन आणि ३० टक्के जुन्या चेहºयांना संधी देण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत ४ सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी काळातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संघटनात्मक जाळे मजबूत करण्यावर नव्या कार्यकारिणीचा भर राहील, अशी माहिती वाघुले यांनी दिली. भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी विशेष सभा झाली. भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाºयांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा सरचिटणीसपदी मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्षपदी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर, राजेश गाडे, सागर भदे, रमेश आंब्रे, महेश कदम, विद्या शिंदे, वर्षा वसंत पाटील, श्रुती महाजन, हर्षराज नारंग, चिटणीसपदी गौरव सिंह, राजेश सावंत, संतोष साळुंखे, विजय भोईर, किशोर गुणीजन, रामकिसन जैस्वार, तृप्ती जोशी-पाटील, श्रुतिका कोळी-मोरेकर, माधुरी मेटांगे यांची, खजिनदारपदी सुदेश खारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी स्नेहा पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी सुरज दळवी, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुरेश पाटील, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नताशा निशांत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी शरिफ शेख यांची नियुक्ती झाली आहे. तसेच इतर पदांच्या देखील नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच कोषाध्यक्षपदासाठी ज्या काही प्रभाग समितीनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात ७० टक्के नवीन तरुण चेहºयांना संधी देत ३० टक्के जुन्या चेहºयांना संधी देण्यात आल्याची माहिती वाघुले यांनी दिली.